Washim News: राज्यात काही भागात पावसाने अजूनही आवश्यक इतकं पावसाने हजेरी लावली नाही. रविवारी 16 जून रोजी राज्यातील विदर्भ(Vidarbha) भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडल्याने चित्र दिसून आले. वाशिम जिल्ह्यातील मानोरा (Manora) तालुक्यात काल मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडल्यामुळे पूर आला. मानोरा तालुक्यातील दापुरा खुर्द आणि दापुरा बुद्रुक या गावातील नदी, झऱ्यामध्ये पावासाच्या पाण्यामुळे पाण्याची पातळी वाढली. गावांमधील रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्त्यांवरिल पूल वाहून गेला आहे.
गावकऱ्यांना ये - जा करण्यासाठी भरपुर त्रास सहन कराव लागत आहे. पुलाची दुरावस्था पाहून गावकरांनी लवकरात लवकर पूल दुरुस्त करण्यास मागणी घातली आहे. पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक तलावांमध्ये पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी हा पूल वाहून गेल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. ग्रामपंचायतीकडून या पूलाची पाहणी करण्यात आली होती. पण गेल्या वर्षीच डागडूजी केलेला हा पूल जोरदार झालेल्या पहिल्याच पावसात वाहून गेल्याचं चित्र आहे. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करत या तुटक्या पुलावरुन येणं जाणं करावा लागत आहे.
भाजपचे आमदार राजेंद्र पटनी यांनी देखील या पूलाची पाहणी केल्याचं सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. जर पूल लवकर दुरुस्त झाला नाही तर आम्ही गावकरी आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. या पूलामुळे गावकऱ्यांसह गाई-गुरांचे ही नुकसान होत आहे. त्याचसोबत गावात एक शाळा असल्यामुळे शेजारील गावातील विद्यार्थी देखील या शाळेत शिकायला येतात. पण पावसाळ्यात पूल तुटल्यामुळे विद्यार्थांना आणि वृध्द नागरिकांना याचा त्रास सहन करावं लागत आहे.