Coronavirus Update: भारतात कोरोनाचा हाहाकार! मागील 24 तासांत आढळले 57,117 नवे रुग्ण तर 765 कोरोना बाधितांचा मृत्यू
Coronavirus (Photo Credit: Twitter)

भारताभोवती कोविड-19 (COVID-19) चा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, देशात मागील 24 तासात 57,117 नवे रुग्ण आढळले असून 765 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 16 लाख 95 हजार 988 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 36,511 वर पोहोचला आहे. सद्य घडीला भारतात 5,65,103 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

भारतात काल दिवसभरात 36,568 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10,94,374 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून येथील रुग्णांचा एकूण आकडा 4 लाख 22 हजार 118 वर पोहोचला आहे. Coronavirus: चिंताजनक! कोरोना बळींच्या संख्येत भारत पाचव्या स्थानी; इटलीलाही टाकले मागे

महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये सर्वाधिक कोकोनाचे रुग्ण आहेत. भारतात शुक्रवारी तब्बल 779 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे भारताने सर्वाधिक मृत्यु झालेल्या देशांच्या यादीत इटलीला मागे टाकत पाचवे स्थान गाठले आहे. यामुळे संपूर्ण देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.