आज 1 ऑक्टोबरपासून नव्या महिन्याला सुरूवात झाली आहे. SBI च्या ग्राहकांसाठी आजपासून कर्ज, एटीएमचा वापर यांच्यामध्ये काही बदल होणात आहे. आजपासून एबीआय बॅंक नव्या दरांनुसार कर्ज सुविधा देणार असल्याने आता तुमच्या कर्जाच्या प्रक्रियेमध्ये होणारे आणि बॅंकिंग सुविधांमधील बदलांमधील नेमके कोणते बदल होणार हे जाणून घ्या. एसबीआयने मीडियम एन्टरप्राइजच्या एक्सटर्नल बेंचमार्कच्या आधारावर लोनसाठी चालना देण्यात आली आहे. यामध्ये एसएसएमइ सेक्टरला सुद्धा अधिक चालना मिळणार आहे. SBI ने 1 जुलै रोजी फ्लोटिंग होम लोन सादर केले होते. मात्र या सुविधेत काही बदल केले असून येत्या 1 ऑक्टोंबर पासून नवी स्किम लागू करण्यात येणार आहे. 1 ऑक्टोंबर पासून 'या' नियमात होणार बदल, अधिक जाणून घ्या.
ATM सेवेमध्ये बदल होणार
एसबीआय यांच्या नियमांनुसार, आता ग्राहकांना 25,000 रूपयांपर्यंत सेव्हिंग असणार्यांना 8-10 फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत. तर एसबीआयच्या एटीएममधून केलेले सारे व्यवहार हे मोफत आहेत. मात्र इतर बॅंकेच्या एटीममधून पैसे काढल्यास मेट्रो सिटीमध्ये 5 आणि इतर शहरांमध्ये 3 मोफत ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत.
ज्या ग्राहकांची ही मर्यादा ओलांडली जाणार आहे त्यांना 5-20 रूपयांचा दंड भरावा लागेल.
कार्डलेस कॅश पर्यायाने पैसे काढणार्यांना 22 रूपये दंड आणि त्यावर जीएसटी आकारला जाणार आहे.
एसबीआय बॅंकेमध्ये सॅलेरी अकाऊंट असणार्यांना आता एटीएमच्या वापरावर निर्बंध नसेल.
पैसे काढण्याची पद्धत
25,000 रूपयांपर्यंत बॅलंस असणार्यांना आता दोन वेळेस बॅंकेच्या कोणत्याही ब्रांचमधून काढू शकता. तर 25 ते 50 हजार बॅलंस असणार्यांना 10 मोफत वेळेस मोफत पैसे काढण्यास मिळणार आहे.
50 हजार ते 1 लाख रूपये बॅंक बॅलन्स असणार्यांना 15 वेळेस पैसे काढता येतील.
तर 1 लाखाहून अधिक बॅंक बॅलन्स असणार्यांना अमर्याद वेळेस पैसे काढण्याची सोय आहे.
मात्र मोफत पैसे काढण्याच्या मर्यादा ओलांडल्यास किमान 50 रूपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे.
कर्ज होणार स्वस्त
एमएसएमइ (MSME), हाउसिंग (Housing), ऑटो (Auto) आणि रिटेल लोन (Retail Loan) यांच्या बदलणाऱ्या दरासंबंधित एक्सटर्नल बेंचमार्कच्या रुपात रेपो रेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोंबर पासून बदल लागू होणार असल्याने आता लोन स्वस्त होणार आहे. आरबीआयने 4 सप्टेंबर ला सर्व बँकांनी रिटेल लोन फ्लोटिंग रेट्स मध्ये बदलण्यात यावे असा आदेश दिला आहे.
आरबीआयचा रेपो रेट आता बॅंकांनाही लागू झाल्याने 30 लाखापर्यंत गृह कर्ज घेणार्यांना आता 8.2% असेल. हा दर नोकरदारांसाठी असेल.