1 ऑक्टोंबर पासून 'या' नियमात होणार बदल, अधिक जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Twitter)

सप्टेंबर महिना संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र सप्टेंबरनंतर येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही आर्थिक बदल होणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टीत बदल होणार आहे. 1 ऑक्टोंबर पासून SBI, GST रेट, कॉर्पोरेट टॅक्स सोबत अन्य काही गोष्टी बदलणार आहेत. तर जाणून घ्या 1 ऑक्टोंबर पासून कोणत्या गोष्टीत बदल होणार आहे.

>>सर्वात प्रथम बदल म्हणजे मंथली अॅव्हरेज बॅलेंस (MAB) संबंधित होणार आहे. एसबीआय बँक खात्यात मंथंली अॅव्हरेज बॅलेंस न ठेवल्यास त्यावर अतिरिक्त शुल्क आकारणार आहे. तर आकारण्यात येणारा शुल्क 80 टक्क्यांपर्यंत असणार आहे. त्यामुळे जर तुमचे खाते मेट्रो सिटी किंवा शहारातील एखाद्या ठिकाणच्या बँक शाखेत असल्यास त्यामध्ये महिन्याला क्रमश: 5,000 ते 3,000 रुपये असणे आवश्यक असणार आहे.

>>बदलत्या वाहतूक नियमानंतर आता 1 ऑक्टोंबर पासून वाहन परवानामध्ये सुद्धा बदल होणार आहे. केंद्र सरकारकडून वाहन परवानामध्ये बदल करण्यात येणार आहे. तसेच नव्या वाहन परवानानुसार गाडी चालकाचा त्याचा परवाना अपडेट करावा लागणार आहे. त्याचसोबत गाडी रजिसट्रेशन सर्टिफिकेट (RC) सुद्धा वाहन परवाना एवढीच महत्वाची ठरणार आहे. तर वाहन परवाना आणि आरसी बुक यांच्या रंगात सुद्धा बदल करण्यात येणार आहे.

>>ऑक्टोंबर महिन्यापासून एसबीआय बँकेच्या एटीएमसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल होणार आहे. आतापर्यंत एसबीआयच्या एटीएममधून विविध बँकांच्या एटीएममधून 10 वेळा जरी पैसे काढल्यास अतिरिक्त चार्जेस स्वीकारले जात नव्हते. मात्र आता ही लिमिट 6 एवढी केली आहे.

>> 1 ऑक्टोंबर पासून लागू होणार आहे. यामध्ये सात वर्षापेक्षा कमी कार्यकाळात शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला वाढलेली पेन्शन दिली जाणार आहे. यापूर्वी जर अशी घटना घडल्यास त्याच्या परिवाराला कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या 50 टक्क्यानुसार वाढलेली पेन्शनची रक्कम देण्यात येत होती.

>>GST संबंधित झालेल्या 37 व्या बैठकीत काही मोठे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार काही वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहे. यामुळे हॉटेल इंडस्ट्रीला याचा मोठा फायदा झाला आहे. तर 1 हजार रुपयापर्यंतच्या भाड्याच्या रुमवर कर लावण्यात येणार नाही आहे. मात्र 7500 रुपये हॉटेल भाडे असणाऱ्या रुमसाठी आता फक्त 12 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.(लिक्विडिटीची कोणतीही कमतरता नाही, खासगी बँक प्रतिनिधींसोबतच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती)

>>तसेच 2 ऑक्टोंबर पासून सरकारकडून पूर्णपणे प्लास्टिक पासून बनलेल्या गोष्टींवर निर्बंध आणणार आहे. देशभरात प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेले कप, पिशव्या, स्ट्रॉ सह अन्य वस्तूंवर बंदी घालणार आहे. भारतात वाढणारे प्रदूषण लक्षात घेता प्लास्टिक बंदी विरोधात अभियान सुरु करण्यात येणार आहे.

तर वरील काही गोष्टींच्या बाबत बदलाव होणार असून त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या आयुष्यावर होणार आहे. परंतु जर तुमची बँक संबंधित काही महत्वाची कामे असल्यास ती सप्टेंबर महिन्याच्या अखेरपूर्वीच पूर्ण करा.