State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

SBI Hikes MCLR: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) 10 बेस पॉईंट्सने वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, हा बदल 15 एप्रिलपासून लागू झाला आहे.

MCLR वाढल्याने गृहकर्ज (Home Loan), वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आणि वाहन कर्ज (Auto Loan) महाग होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल. SBI च्या वेबसाइटनुसार, 15 एप्रिल 2022 पासून ही दरवाढ लागू झाली आहे. आता तीन महिन्यांपर्यंतच्या ग्राहकांसाठी मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) 6.65% ऐवजी 6.75% असेल. तत्पूर्वी, बँक ऑफ बडोदा (BoB) ने देखील निधीवर आधारित कर्ज दरांची किरकोळ किंमत 5 bps ने वाढवली आहे. (हेही वाचा - HDFC Bank Merger: HDFC LTD आणि HDFC बँकेचे विलीनीकरण का होत आहे? काय आहे योजना आणि त्याचा परिणाम काय होईल? जाणून घ्या)

नवीन दर -

याशिवाय 6 महिन्यांसाठी 6.95 टक्क्यांऐवजी MCLR 7.05 टक्के असेल. त्याच वेळी, एका वर्षाच्या MCLR साठी 7.10%, दोन वर्षांसाठी 7.30% आणि तीन वर्षांसाठी 7.40%. रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या आठवड्यात आपल्या पतधोरणात रेपो दर 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

MCLR म्हणजे काय?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2016 मध्ये MCLR प्रणाली सुरू केली होती. हा कोणत्याही वित्तीय संस्थेसाठी अंतर्गत बेंचमार्क आहे. MCLR प्रक्रियेत, कर्जासाठी किमान व्याजदर निश्चित केला जातो.