Sarkari Naukari (Photo Credits: File Image)

Sarkari Naukri / Professor Recruitment 2019: दिल्ली विद्यापीठात (DU) सहाय्यक प्राध्यपकाच्या (Assistant Professor) तब्बल 89 रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे, यासाठी पात्र उमेदवार 28 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने www.svc.ac.in वर अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे यामध्ये निवड झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सातव्या वेतन आयोगाच्या अनुसार पगाराचा लाभ मिळणार आहे. तसेच  नियमांनुसार अन्य भत्ते देखील या ऑफर मध्ये समाविष्ट आहेत. 7th Pay Commission: कर्मचार्‍यांना प्रमोशन मिळवण्यासाठी पुर्ण करावी लागणार 'ही' एक अट; अर्थमंत्र्यालयाने दिली माहिती.

प्राप्त माहितीनुसार, दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत श्री वेंकटेश्वर कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही निवड केली जाणार आहे, अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपली पात्रता खालील निकषांवर तपासून घ्यावी..

-उमेदवाराचा शैक्षणिक रेकॉर्ड हा 55% च्या खाली नसावा.

- ज्या विषयाच्या शिक्षण पदी अर्ज करत आहेत त्यातील पदव्युत्तर शिक्षण झालेले हवे. (मास्टर डिग्री अनिवार्य)

-अर्ज करणाऱ्या उमेदवाराने UGC आणि CSIR द्वारे घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) किंवा (UGC) द्वारे मान्यता प्राप्त सामान स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. (7th Pay Commission News: रेल्वेमध्ये सुरु झाली Clerk पदांसाठी नोकरभरती; 12 वी पास उमेदवार करू शकतात rrccr.com वर अर्ज)

दरम्यान, उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना 57 हजार 700 रुपये प्रतिमहिना पगार ऑफर करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष अधिकृत वेबसाईटला 'इथे क्लिक करून' एकदा भेट द्यावी.