Post Office Savings Account मध्ये किमान 500 रूपये नसल्यास 11 डिसेंबर नंतर भरावा लागणार दंड
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) तुमचं बचत खातं (Savings Account) असेल तर तुम्हांला एक नवा नियम जाणून घेनं आवश्यक आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने आता बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स (Minimum Balance) जमा करण्यासाठी एक विशिष्ट तारीख दिली आहे. अधिकृत सोशल हॅन्डलद्वारा याची माहिती देताना आता 11 डिसेंबर पर्यंत तुमच्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये किमान 500 रूपये ठेवा असं आवाहन करण्यात आला आहे. त्यामुळे आता ही डेडलाईन अवघी एका दिवसावर येऊन ठेपली आहे. तुमचं देखील पोस्टात बचत खातं असेल तर त्याचा किमान बॅलन्स किती आहे? हे एकदा तपासून पहा अन्यथा तुम्हांला आर्थिक वर्षाच्या शेवटी 100 रुपयांचे मेंटेनन्स शुल्क द्यावं लागणार आहे.

भारतीय पोस्ट च्या नियमानुसार व्यक्तिगत किंवा जॉईंट पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट मध्ये 4% दराने ग्राहकांना व्याज दिले जाते. पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटवर मिळणारे व्याज हे महिन्याची 10 तारीख ते महिना अखेरी दरम्यान या काळात असलेल्या रक्कमेच्या आधारे दिली जाते. जर तुमच्याकडे या काळात 500 पेक्षा कमी रक्कम असेल तर त्यावर व्याज दिले जात नाही.

India Post ट्वीट

सध्या ग्राहकांना इंडिया पोस्टच्या नव्या नियमाची आठवण करून देण्यासाठी मेसेज पाठवले जात आहेत. जर तुम्हांला वर्षाचा मेंटेनन्स चार्ज वाचवायचा असेल तर तुम्हांला 11 डिसेंबर 2020 पूर्वी किमान 500 रूपये ठेवणं गरजेचे आहे. आता पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यात किमान रक्कमदेखील न ठेवू शकणार्‍यांच्या अकाऊंटमधून 100 रूपयांचा दंड कापला जाईल. अकाऊंटमध्ये ही रक्कमदेखील नसल्यास ते अकाऊंट बंद  केले जाणार असल्याची माहिती पोस्टाच्या वेबसाईटवरून देण्यात आली आहे.