जागतिक महारोग कोरोना व्हायरस हा भारतासह जगातील अन्य देशात सुद्धा आपले थैमान घालत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत जसजशी घट होत आहे त्यानुसार दैनंदिन जीवन सुरळीत होण्यास मदत होत आहे. लोक आता परदेशात फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र अद्याप काही देशांमध्ये प्रवासासाठी बंदी घातली गेली आहे. दुसऱ्या बाजूला काही देशांनी नियम आणि अटींचे पालन करत इंटरनॅशनल बॉर्डर पर्यटाकांसाठी सुरु केल्या आहेत. मात्र कोविडच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य असणार आहे.
जर तुम्ही विदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे कोरोनाचे प्रमाणपत्र पासपोर्टला लिंक करावे लागणार आहे. जाणून घ्या तुम्ही लसीकरण प्रमाणपत्र कशा प्रकारे पासपोर्टला लिंक करु शकता.(आज PM Narendra Modi विशेष गुणधर्म असलेल्या 35 पिकांची वाणे राष्ट्राला समर्पित करणार)
-सर्वात प्रथम कोविनची अधिकृत वेबसाइट www.cowin.in वर भेट द्या.
-यामध्ये लॉगिन करण्यासाठी होम पेजवर सपोर्ट ऑप्शन वर क्लिक करा.
-सपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही Certification Corrections वर क्लिक करा.
-येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लसीकरणा संबंधित स्टेटस दाखवले जाईल.
-आता Raise an Issue ऑप्शनवर क्लिक करा.
-या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता Add Passport Details वर क्लिक करा.
-त्यानंतर ज्या व्यक्तीला पासपोर्टपासाठी लसीकरणाचे डिटेल्स द्यावे लागणार आहेत. तेथे तुम्हाला नाव आणि पासपोर्ट क्रमांक द्यावा लागणार आहे.
-एकदा माहिती दिल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड क्रमांकावर मेसेज येईल.
-त्यानंतर कोविन अॅपच्या माध्यमातून लसीकरण सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहे. यामध्ये पासपोर्टचे डिटेल्स अपडेट होणार आहे.
कोविन सर्टिफिकेट आता आंतरराष्ट्रीय फॉर्मेटवर आधारित असणार आहे. हा फॉर्मेट आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी WHO कडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांवर आधारित असणार आहे. हे नवे फिचर आणि जन्म तारीखचे फॉर्मेट आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी निर्धारित WHO मानकांनुसार YY-MM-DD फॉर्ममध्ये असणार आहे.