खाजगी कंपनी काम करणारे नोकरदार एका विशिष्ट टप्प्यानंतर कामाची कंपनी बदलत राहतात. त्यामुळे कंपनी बदलली की पीएफ अकाऊंट्स (PF Account) वाढत जातात. पण एकापेक्षा अनिक पीएफ अकाऊंट्स ठेवण्यापेक्षा एकाच अकाऊंटमध्ये तुम्ही सारे पैसे का ठेवत नाहीत? तुम्ही अगदी घरच्या घरी आणि ऑनलाईन तुमची पीएफअकाऊंट्स मॅनेज करू शकता. तुमच्या सध्याच्या पीएफ अकाऊंटमध्ये मागील जुनी पीएफ अकाऊंटमधील रक्कम वळती करू शकता. मग नेमकी ही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर कशी, कुठे करायची याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय ते देखील जाणून घ्या नक्की! Online PF Withdrawal Process: पीएफ अकाऊंट मधून ऑनलाईन पैसे कसे काढाल, क्लेम स्टेट्स ट्रॅक करण्याची पद्धत जाणून घ्या कशी आहे संपूर्ण प्रक्रिया!
PF Account मधील रक्कम ट्रान्सफर कशी कराल?
- UAN नंबर आणि पासवर्ड यांच्या मदतीने तुमचं पीएफ अकाऊंट लॉग ईन करा.
- ऑनलाईन सर्व्हिस टॅब मध्ये ट्रान्स फर रिक्वेस्ट या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या शेवटच्या ईपीएफ अकाऊंटची माहिती द्या.
- या ट्रान्सफर व्हेरिफिकेशन साठी तुम्हांला सध्याच्या किंवा मागील कंपनीकडून ट्रान्सफर अॅप्लिकेशन सादर करावं लागतं
- जेथे विचारला असेल तेथे तुमचा आयडी किंवा UAN नंबर द्या.
- Get MID वर क्लिक करून MID नंबर देखील मिळवू शकता.
- MID नंबर मिळाल्यानंतर तुम्हांला GET OPT च्या पर्यायवर क्लिक करून रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी तेथे भरायचा आहे.
- यानंतर पीएफ ट्रान्सफर अॅप्लिकेशनची सेल्फ़ अटेस्टेट कॉपी तुम्हांला पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची आहे.
- कंपनी यानंतर पीएफ ट्रान्सफरची रिक्वेस्ट ऑनलाईन मंजूर करू शकते.
- ही रिक्वेस्ट मंजूर झाल्यानंतर आपोआप तुमचा पीएफ ट्रान्सफर केला जाईल.
दरम्यान तुम्ही या प्रक्रियेदरम्यान ट्रॅकिंग आयडीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवू शकता. यामध्ये नोकरदाराने ट्रान्सफर क्लेम फॉर्म म्हणजेच फॉर्म 13 हा डाऊनलोड करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हांला क्लेम फॉर्म सादर करणं गरजेचे ठरू शकते. ही प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने त्यासाठी कर्मचार्याकडे अॅक्टिव्ह UAN नंबर असणं गरजेचे आहे. त्यांची माहिती अपडेटेड असणं गरजेचे आहे तसेच बॅंक अकाऊंट, आधार कार्ड नंबर हे देखील अचूक आहेत का? हे तपासूनच पुढील प्रक्रियेला सुरूवात करा.