Online PF Withdrawal Process: पीएफ अकाऊंट मधून ऑनलाईन पैसे कसे काढाल, क्लेम स्टेट्स ट्रॅक करण्याची पद्धत जाणून घ्या कशी आहे संपूर्ण प्रक्रिया!
PPF Account | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये Employee Provident Fund Act of 1952,च्या नियमानुसार, भारत सरकारने EPF स्कीम बनवलेली आहे. यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात ती कंपनी आणि तुमच्या पगारातून विशिष्ट रक्कम दरमहा एकत्र साठवली जाते. दरम्यान ही रक्कम नोकरदार व्यक्तीला त्याच्या रिटायरमेंट नंतर लागणार्‍या खर्चासाठी वापरण्यासाठी असते. सोबतच नोकरदार मंडळी काही आपत्कालीन परिस्थितीमध्येही ती काढू शकतात. त्यासाठी EPF स्कीम मध्ये विशिष्ट नियमावली आहे.

घराच्या खरेदीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या लग्नासाठी किंवा नोकरी गमावल्यास खर्चासाठी तुम्ही रिटायर होण्यापूर्वीच पीएफ मधून पैसे काढू शकता. यासाठी ठोस कारणासह तुम्हांला अर्ज करणं बंधनकारक आहे. आता हा अर्ज ऑनलाईन देखील सादर करण्याची सोय आहे. पहा त्याची संपूर्ण प्रक्रिया ( नक्की वाचा: COVID-19 Outbreak चं कारण देत PF अकाऊंट मधून कसे काढाल पैसे? इथे पहा सविस्तर माहिती)

PF अकाऊंटमधून ऑनलाईन पैसे कसे काढाल?

 • https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर क्लिक करा.
 • पीएफ अकाऊंट पाहण्यासाठी UAN आणि password योग्य भरा.
 • 'Online Services'टॅबमध्ये 'Claim (Form-31, 19, 10C & 10D)'वर क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्हांला युएएनसोबत लिंक असलेला बॅंक अकाऊंट नंबर द्यावा लागेल. पुढे व्हेरिफायवर क्लिक करा.
 • बॅंक डिटेल्स तपासल्यानंतर तुम्हांला अटी आणि शर्थी मान्य कराव्या लागतील.
 • 'Proceed For Online Claim'वर क्लिक करा.
 • त्यानंतर नव्या विंडोमध्ये तुम्ही पात्र असलेल्या कारणांची यादी पाहता येते. त्यामधून योग्य कारण निवडा.
 • पैसे काढण्याचं कारण दिल्यानंतर तुम्हांला तुमचा संपूर्ण पत्ता देणं आवश्यक आहे.
 • त्यानंतर स्कॅन केलेला चेक किंवा पासबूक कॉपी अपलोड करावी लागेल.
 • पुढे 'Get Aadhaar OTP'वर क्लिक करा.
 • तुमच्या आधार सोबत लिंक असलेल्या क्रमांकावर एक नंबर येईल तो एंटर करा.
 • तुमचा पैसे काढण्यासाठीचा अर्ज अशाप्र्कारे सादर केला जाईल.

तुम्हांला चेक किंवा पासबूक व्यक्तिरिक्त इतर कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करावं लागत नाही. तसेच तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये निवृत्त होण्याच्या 1 वर्ष आधी पर्यंत सुमारे 90% रक्कम पीएफ अकाऊंटमधून काढू शकता.

पीएफ चा क्लेम ट्रॅक कसा करायचा?

e-Sewa portal वर तुम्ही पीएफ अकाऊंटच्या माध्यमातून तुमचा क्लेम ट्रॅक देखील करू शकता. ‘Online Services’ मध्ये 'Track Claim Status'चा पर्याय आहे.

नोकरदार व्यक्तीकडून अर्ज दाखल झाल्यानंतर तुम्ही दिलेली माहिती आणि

ईपीएफओ कडून क्रॉस चेक केली जाते. माहिती अचूक असेल तर तुमचा क्लेम मंजुर करून रक्कम थेट तुमच्या अकाऊंटमध्ये वळवली जाते.