Calendrer | Pixabay.com

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आता आर्थिक व्यवहार करताना काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. वर्षअखेरीच्या शेवटच्या महिन्यात एचडीएफसी बॅंकेच्या Regalia क्रेडिट कार्ड धारकांसाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच 1 डिसेंबर पासून काही सिम कार्ड्सच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. दर महिन्याप्रमाणे या महिन्यांतही पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे त्यामध्येही वाढ-घट केली जात आहे का? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष असणार आहे.

HDFC Regalia क्रेडिट कार्ड

HDFC Regalia क्रेडिट कार्डसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. लाऊंजच्या वापराबाबत हे बदल आहेत. 1 डिसेंबरपासून लाउंजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही अटी पूर्ण करणं आता या कार्ड धारकांसाठी आवश्यक आहे. रेगेलिया क्रेडिट कार्डधारक केवळ खर्चाच्या आधारावर लाउंजमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. लाउंज प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी, क्रेडिट कार्ड युजर्सना एका कॅलेंडर तिमाहीत 1 लाख किंवा त्याहून अधिक खर्च केलेला असणं आवश्यक आहे. स्मार्ट बाय पेज आणि लाउंज बेनिफिट्स पेजला भेट देऊन ग्राहकाला लाउंज व्हाउचरचा दावा करावा लागेल. तुम्ही एका तिमाहीत फक्त दोनदा लाउंज वापरण्यासाठीचा लाभ घेऊ शकतील. लाउंज प्रवेशाच्या वेळी 2 रुपये व्यवहार शुल्क आकारले जाईल. मास्टरकार्डच्या ग्राहकांच्या कार्डमधून 25 रुपये कापले जातील पण नंतर ते परत केले जातील.

सीम कार्ड साठी नियम

केंद्र सरकारने सिमकार्ड खरेदी-विक्रीचे नियम देखील बदलले आहेत. नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर, एका आयडीवर मर्यादित सिम खरेदी करता येणार आहेत. New SIM Card Rules Effective December 1: नवीन सिम कार्ड खरेदीसाठी 1 डिसेंबरपासून नवे नियम लागू; घ्या जाणून.

गॅस सिलेंडरच्या किंमती

एलपीजी सिलेंडर, सीएनजी, पीएनजी यांच्या किंमती महिन्याभरासाठी 1तारखेला ठरतात. मागील महिन्यात सणासुदीच्या काळात केवळ कमर्शिअल गॅस सिलेंडरचे दर वाढवले होते आता हे दर या महिन्यात पुन्हा वाढणार का? घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होतेय का? याकडे गृहिणींचे लक्ष असेल.