खुशखबर! NEFT ऑनलाईन सेवा आता 24 तास सुरु
NEFT (National Electronic Funds Transfer) ची प्रक्रिया ही विशिष्ट कालावधीपुरता मर्यादित होती. मात्र त्यात आता बदल होऊन नवीन नियमानुसार, आजपासून ही सेवा 24X7 सुरु करण्यात आली आहे. याआधी केवळ बँकेच्या कामकाजाच्या वेळातच एनईएफटी व्यवहार करता येत होता.
सध्याच्या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन व्यवहार होत आहेत. सध्याच्या फास्ट लाईफमध्ये लोकांना बँकेत जाऊन, रांगा लावून व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन सेवा करणे खूपच सोयीस्कर वाटू लागलेय. मात्र हा ऑनलाईन व्यवहार करतानाही कायद्याची बरीच बंधने असतात. त्यात NEFT (National Electronic Funds Transfer) ची प्रक्रिया ही विशिष्ट कालावधीपुरता मर्यादित होती. मात्र त्यात आता बदल होऊन नवीन नियमानुसार, आजपासून ही सेवा 24X7 सुरु करण्यात आली आहे. याआधी केवळ बँकेच्या कामकाजाच्या वेळातच एनईएफटी व्यवहार करता येत होता.
RBI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, NEFT अंतर्गत आर्थिक व्यवहारांची सुविधा आता आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध होणार आहे. यामुळे ऑनलाईन करणा-या असंख्य ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. ही सेवा 24 तास सुरु केल्याने सुट्टीच्या दिवशी गैरसोय होणा-या ग्राहकांना याचा अधिकाधिक लाभ होणार आहे.
हेदेखील वाचा- बदलत आहेत बँक, रेस्ते आणि टेलिकॉम क्षेत्रातील नियम; Fastag, NEFT व Portability संदर्भात घ्या जाणून
सध्या बँकेच्या कामकाज वेळेनंतर 'एनईएफटी'चे व्यवहार केल्यास बँका आपणहून तो व्यवहार 'स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग' (एसटीपी) माध्यमात वळता करतात. 'एनईएफटी'द्वारे व्यवहार केल्यानंतर लाभार्थी खात्यात रक्कम जमा होण्यासाठी किमान दोन तासांचा अवधी लागतो. हा नियम यापुढेही कायम राहील, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
'एनईएफटी'चे व्यवहार चोवीस तास उपलब्ध करून दिले जातील, असे रिझर्व्ह बँकेने ऑगस्टमध्ये जाहीर केले होते. त्यानुसार 15 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजता NEFT ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
MPC च्या बैठकीनंतर आरबीआय गवर्नर यांनी असे म्हटले आहे की, बँकेच्या वर्किंग डे मध्ये आता 24 तास एनईफटीच्या सुविधेचा लाभ खाते धारकांना घेता येणार आहे. त्याचसोबत आरबीआयने नुकतेच आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्क काढून टाकले आहेत. तर डिजिटल ट्रांजेक्शनला चालना मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या आकड्यानुसार एप्रिल महिन्यात एनईएफटीच्या माध्यमातून 20.34 कोटी ट्राजेक्शन झाले आहेत. आरटीजीएसच्या माध्यमातून 1.14 कोट्यावधींची देवाण-घेवाण करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2019 08:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

