Mumbai Dangerous Bridge: नव्याने झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले 15 धोकादायक पूल; जाणून घ्या यादी
Mumbai CSMT Foot-Over-Bridge Collapse (Photo Credits: PTI)

14 मार्च रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जवळील ‘हिमालय पूल’ दुर्घटनेमध्ये (Himalaya Bridge Collapse) तब्बल 7 जणांचा जीव गेला होता. झालेल्या चेंगरा चेंगरीमध्ये 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. त्यानंतर मुंबई मधील धोकादायक पुलांचा (Dangerous Bridge) प्रश्न ऐरणीवर आला. या दुर्घटनेनंतर सर्व पुलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 15 पूल नव्याने धोकादायक आढळले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जे 29 पूल धोकादायक आढळले होते, त्यातील 8 पूल आधीच पाडण्यात आले आहेत. आता पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये उरलेल्या पुलांची डागडुजी होणार आहे.

पावसाळ्यात पुलांची अवस्था अजून खराब होते, ही गोष्ट लक्षात घेऊन हे धोकादायक पूल रहदारीसाठी, वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केले जाणार आहेत. अजोय मेहता यांनी दिलेल्या आदेशानुसार जे ऑडिट केले गेले त्यामध्ये पूर्व उपनगरात 7, पश्चिम उपनगरात 19 आणि शहर विभागात 3 धोकादायक पूल आढळले आहेत.

धोकादायक पुलांची यादी

  • पश्चिम उपनगर - हंस बुग्रा मार्ग, पाइपलाइन सर्व्हिस रोड ब्रीज, वलभाट नालाब्रीज, विठ्ठल मंदिर इरानी वाडी रगडापाडा ब्रीज, एसव्ही रोड कृष्णकुंजजवळील ब्रीज, आकुर्ली रोड, हनुमान नगर ब्रीज, ओशिवरा नाला, एसव्ही रोड ब्रीज, पिरामल नाला, लिंक रोड, एसबीआय कॉलनी ब्रीज, रतन नगर ते दौलत नगर ब्रीज
  • पूर्व उपनगर - कुर्ला येथील हरी मस्जीत नाला, लक्ष्मी बाग कल्हर्ट नाला ब्रीज, घाटकोपर निकांथ ब्रीज, विक्रोळी पंतनगर नाला (हेही वाचा: पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा पूल 27 मे पासून बंद, डोंबिवलीकरांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार)
  • नव्याने आढळलेल धोकादायक पूल – वाकोला पाइपलाइन सर्व्हिस रोड पुल, जुहू तारा रोड पूल, ढोबी घाट मज्जास नाला पूल, मेघवाडी नाला, श्यामनगर अंधेरी, बांद्रा धारावी नदी पूल, रतन नगर ते दौलत नगर पूल कांदिवली, ओशिवरा नाला एसव्ही रोड गोरेगाव, पिरामल नाला लिंक रोड, चंदवाडकर नाला मालाड, मालाड कुराना गाव गांधी नगर, प्रेम सागर नाला, फॅक्टरी लेन, बोरीवली, कन्नमवार नगर, घाटकोपर

दरम्यान हिमालय पूल दुर्घटना होण्याआधी पालिकेने केलेल्या 344 पुलंच्या तपासणीमध्ये 14 धोकादायक पूल आढळले होते. या पुलांच्या पुनर्बांधणीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.