Maharashtra Lottery | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra State Lottery Types: 'मला लॉटरी लागली तर..' हा कल्पनाविस्तार शालेय जीवनात परिक्षा देताना अनेकांनी केला असेल. काही जण या कल्पनाविस्तारासह आयुष्यभर स्वप्नं रंगवत आजही जगत असतील. त्यातीलच काही लोक प्रत्यक्ष लॉटरी (Maharashtra State Lottery) तिकीट खरेदी करुन निशिब आजमवून पाहतातही. आपणही यांपैकीच एक असाल तर आपल्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरु शकते. महाराष्ट्र राज्य लॉटरी साप्ताहीक सोडत (Maharashtra State Lottery Draws Days) दर दिवशी जाहीर होत असते. ती जाणून घेतल्यास तुम्हालाही नशिब आजमावता येऊ शकते. अर्थात यालाही बरेच नियम आणि अटी लागू असा प्रकार असतो. त्यामुळे हे नियम आणि अटी तिकीट खरेदी करण्यापूर्वीच माहिती असतील तर अधिक सोईस्कर. दरम्यान, महाराष्ट्रात सोडत निघणाऱ्या साप्ताहीक लॉटरीची नावे माहिती असणेसुद्धा महत्त्वाचे.

सोडतीचे नाव आणि वार

सोमवार-

  • सागरलक्ष्मी (Sagarlakshmi)
  • महा.गजलक्ष्मी (Maha. Gajalakshmi)
  • गणेशलक्ष्मी भाग्यशाली (Ganesh Lakshmi Bhayshali)
  • महा. सह्याद्री धनलक्ष्मी (Maha. Sahyadri Dhanalakshmi)

(हेही वाचा, Mega Millions jackpot New Jersey: एका रात्रीत मालामाल, मेगा मिलियन्स जॅकपॉट जिंकला; न्यू जर्सी येथील व्यक्तीस मिळाले 1.13 अब्ज डॉलर)

मंगळवार-

  • पद्मिनी (Padmini)
  • महा. गजलक्ष्मी मंगळ (Maha. Gajalakshmi Mamgal)
  • गणेशल्क्ष्मी शुभ (Ganesh Lakshmi Shubha)
  • महा. सह्याद्री महालक्ष्मी

(हेही वाचा, Kerala: केरळमधील मासे विक्रेत्या तरुणास ७० लाख रुपयांची लॉटरी, बँकेकडून जप्तीची नोटीस आल्यावर पालटले नशीब)

बुधवार-

  • अक्षय (Akshay)
  • महा. गजलक्ष्मी बुध (Maha. Gajalakshmi Budh)
  • गणेशलक्ष्मी विजयी (Ganesh Lakshmi Vijay )
  • महा. सह्याद्री विजयालक्ष्मी (Maha. Sahyadri Vijayalakshmi)

(हेही वाचा, Abu Dhabi: केरळच्या महिलेने जिंकली 44.75 कोटी रुपयांची लॉटरी, पाहा व्हिडीओ)

गुरुवार-

  • आकर्षक पुष्कराज (Akarshak Pushkaraj )
  • महा. गजलक्ष्मी गुरु (Maha. Gajalakshmi Guru)
  • गणेशलक्ष्मी गौरव (Ganesha Lakshmi Gaurav)
  • महा. सह्याद्री दीपलक्ष्मी (Maha. Sahyadri Deepakshmi)

शुक्रवार-

  • वैभवलक्ष्मी (Vaibhavalakshmi)
  • महा. गजलक्ष्मी आकर्षक (Maha. Gajalakshmi Akarshak )
  • गणेशलक्ष्मी धन (Ganesh Lakshmi Dhan)
  • महा. सह्याद्री राजलक्ष्मी (Maha. Sahyadri Rajalakshmi)

शनिवार-

  • महाराष्ट्रलक्ष्मी (Maharashtra Lakshmi)
  • महा. गजलक्ष्मी (Maha. Gajalakshmi)
  • गणेशलक्ष्मी समृद्धी (Ganesh Lakshmi Samruddhi)
  • महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी

रविवार-

  • मोहिनी (Mohini)
  • महा. गजलक्ष्मी (Maha. Gajalakshmi)
  • गणेशलक्ष्मी वैभव (Ganesha LakshmiVaibhav)

महाराष्ट्र लॉटरी संदर्भात अधिक माहिती आणि तपशील

Gudipadwa Bumper Lottery Results- बक्षिसांची रक्कम मिळवण्यासाठी काही नियम आहेत. त्यानुसार 10,000/- रुपयांपर्यंतचे बक्षीस ज्या विक्रेत्याकडून तिकीट घेतले त्याच्याकडून घेता येते. रुपये 10,000/- पेक्षा अधिक रकमेच्या बक्षीसाची मागणी उपसंचालक(वि व ले), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी नवी मुंबई, यांच्याकडे करावी. सोडतीच्या दिनांकानंतर 90 दिवसांत मूळ तिकिटासह बक्षिसाची मागणी करणे बंधनकारक आहे. सोडतीचे अधिकृत निकाल अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध तसेच निवडक वर्तमानपत्रात प्रसिध्द होतात. अर्जपत्रिका, अटी व शर्ती डाऊनलोड करण्‍यासाठी http://lottery.maharashtra.gov.in येथे भेट द्यावी किंवा ०२२-२७८४६७२० किंवा ०२२-२७८४५४८१ येथे फोन करावा. बक्षीस विजेत्यांना बक्षिसांची मागणी सादर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी- मागणी पत्राचा नमुना, प्रतिज्ञापत्र, क्षतिपूर्ती बंधपत्र व अनुमती. बँकेचे तपशील इत्यादी.

दरम्यान, लॉटरी हे पूर्णपणे मृगजळ नसले तरी ती लागल्याने करोडपती होणाऱ्यांसी संख्या अगदीच कमी असते. हे केवळ भारतच नव्हे तर जगभरातील चित्र आहे. हजारो, करोडो लोक लॉटरीचे तिकीट खरेदी करतात. त्यापैकी काहींचेच नशीब फळफळते. त्यांना लॉटरी लागते तिकीटाच्या रकमेवर असलेल्या बक्षिसानुसार त्यांना नियम व अटींच्या अधिन राहून निश्चित रक्कम मिळतेही. दरम्यान, इतर लोक मात्र ज्यांना लॉटरी लागली आहे अशांकडे पाहून आपलेही नशीब कधीतरी उघडेल असा विचार करत तिकीट खरेदी करतात. अर्थात तुम्हासही तुमचे नशिब आजमावून पाहायचे असेल निश्चित विचार करु शकता.