LIC Assistant Prelims 2019 Exam: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानामुळे 'एलआयसी' च्या सहाय्यक पद भरती पूर्व परीक्षा तारखेमध्ये बदल; 30,31 ऑक्टोबरला होणार परीक्षा
LIC Exam | Photo Credits Pixabay and Twitter

LIC Assistant Prelims 2019 Exam Dates:   लाईफ इन्श्युअरन्स कॉरपरेशन ऑफ इंडिया (LIC) कडून घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. 21 आणि 22 ऑक्टोबर दिवशी होणारी एलआयसीची सहाय्यक पद भरतीची पूर्व परीक्षा (LIC Assistant Prelims 2019 Exam) आता 30 आणि 31 ऑक्टोबर दिवशी पार पडणार आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर दिवशी 288 विधानसभा संघांमध्ये मतदान होणार आहे. अशावेळेस परीक्षार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून परीक्षांच्या तारखेमध्ये बदल करण्यात आले आहेत. LIC Recruitment 2019: एलआयसी मध्ये 8 हजार पदांसाठी मेगा भरती

17 सप्टेंबर दिवशी एलआयसी कडून जाहीर करण्यात आलेल्या एलआयसीच्या पद भरतीबद्दालच्या नोटिफिकेशनमध्ये केवळ परीक्षा तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. इतर नियम सारखेच असतील असे नमूद करण्यात आले आहे. 15 ते 22 ऑक्टोबर दरम्यान एलआयसीकडून अ‍ॅडमीट कार्ड जारी केले जाणार आहे. ऑनलाईन माध्यमातून कॉल लेटर डाऊनलोड करताना परीक्षार्थींनी परीक्षेची तारिख, वेळ आणि केंद्र तपासून पहावे असे आवाहन करण्यात आले आहे. येथे पहा एलआयसी सहाय्यक पद भरतीचंं नोटीफिकेशन

एलआयसी तर्फे देशात मध्य, पूर्व, पूर्व केंद्रीय, उत्तर, उत्तर केंद्रीय, दक्षिण, दक्षिण केंद्रीय आणि पश्चिम या विभागांमध्ये मेगाभरती केली जाणार आहे. याकरिता महाराष्ट्रात मुंबई,ठाणे , रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे येथे परीक्षा केंद्रे असणार आहेत.