जपान (Japan) मध्ये भूगर्भशास्त्रज्ञांकडून पहिल्यांदाच 'Megaquake' चा अंदाज जारी केला आहे. काल जपान मध्ये काही मिनिटांच्या फरकामध्ये 2 भूकंप झाले होते. 7.1 च्या भूकंपानंतर जपान मधील परिस्थितीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाले आहेत. दरम्यान जपानच्या southern coast मध्ये हे धक्के जाणवले आहेत. या भूकंपानंतर आता मेगाक्वेवचा अंदाज आहे. जर हा मेगाक्वेव झालाच तर हजारो जीव जाण्याचा अंदाज आहे. कालच्या भूकंपानंतर त्सुनामी चा देखील अंदाज होता मात्र त्यामध्ये जीवितहानीचं वृत्त नाही.
2011 च्या विनाशकारी भूकंप, त्सुनामी आणि सुमारे 18,500 लोकांचा बळी घेणाऱ्या nuclear disaster नंतर स्थापित केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार जपान हवामानशास्त्र संघटनेने ही 'मेगा क्वेव'ची सूचना जारी केली आहे. नक्की वाचा: Japan Earthquake: जपान पुन्हा भूकंपाने हादरले; 7.1 रिश्टर स्केल तीव्रता, अनेक भागात सुनामीचा इशारा (Video).
Megaquake Advisory काय आहे?
JMA च्या Megaquake Advisory मध्ये जर मोठे भूकंप झाले तर तीव्र धक्के जाणवण्याचा आणि सोबतच त्सुनामी येण्याचा धोका वर्तवला आहे. हा धोका जरी वर्तवला असला तरीही तो कोणत्या वेळेदरम्यान होऊ शकतो याबाबत माहिती दिलेली नाही. तसेच हा महाकाय भूकंप सामान्यपेक्षा अधिक तीव्रतेचा असू शकतो.
Nankai Trough शी संबंधित ही नियमावली आहे. यामध्ये पॅसिफिक महासागरातील दोन टेक्टोनिक प्लेट्समधील समुद्राखालील सबडक्शन झोन, जिथे यापूर्वी लक्षणीय भूकंप झाले आहेत. Shizuoka ते Southern end of Kyushu island पर्यंत हा Trough 800 किलोमीटर पसरलेला आहे. प्रत्येक एक ते दोन शतकांमध्ये आठ किंवा नऊ तीव्रतेचे विनाशकारी भूकंप या भागाने अनुभवले आहेत.
Megaquake म्हणजे काय?
Megaquakes हे सुमारे 100-150 वर्षामध्ये येतात. जपानच्या मार्च 2011 मधील विध्वंसक भूकंपापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे. आता हे महाकाय भूकंप Nankai trough च्या भागात आहे. जपानने एक अलर्ट लागू केला आहे. अशा प्रकारचा अलर्ट 6.8 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप जेव्हा megathrusts असलेल्या भागावर होतो किंवा जेव्हा टेक्टोनिक प्लेट्समध्ये असामान्य बदल आढळतात तेव्हा होतो.
धोका काय आहे?
जपान सरकारने यापूर्वीच Nankai Trough मध्ये 30 वर्षामध्ये 8-9 मॅग्निट्युटच्या मेगाक्वेकच्या 70% शक्यता वर्तवल्या आहेत. अगदीच वाईट परिस्थितीमध्ये तज्ञांच्या अंदाजानुसार, 3 लाख बळींचा अंदाज आहे. तर नुकसान हे सुमारे 13 डॉलर ट्रिलियनचं वर्तवण्यात आलं आहे. यामध्ये पायाभूत सुविधा पूर्ण कोसळण्याचा अंदाज आहे. Geologists Kyle Bradley आणि Judith A Hubbard यांनी नानकाई येथील भूकंपाचा इतिहास खरोखरच चिंताजनक आहे असं म्हटलं आहे.
दरम्यान तत्काळ घाबरून जाण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. जपानच्या भूकंप झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना फर्निचर सुरक्षित करण्याचा आणि त्यांच्या जवळच्या Evacuation Shelter चे स्थान जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जपान मध्ये अनेक घरे जीवनावश्यक वस्तूंसोबत आपत्ती किटही ठेवतात.
दुसऱ्या भूकंपाचा धोका वाढला असला तरी तो कमीच आहे, कॅलिफोर्नियातील एका नियमानुसार कोणत्याही भूकंपाची पूर्वशॉक असण्याची शक्यता सुमारे पाच टक्के असते.