ICMR Recruitment 2021: आयसीएमआर कडून Project Research Scientist सह महत्त्वाच्या पदांसाठी  नोकरभरती; 25 जून पूर्वी करा अर्ज

द इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट (Project Research Scientist-II), प्रोजेक्ट कन्सल्टंट (Project Consultant (Non-Medical)) या सह काही पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना 25 जून 2021 पर्यंत आपला अर्ज दाखल करायचा आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन . दरम्यान अर्जासाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे आणि इतर डॉक्यूमेंट covidclinical.registry@gmail.com वर पाठवणे गरजेचे आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट -II: 01

प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट III: 01

प्रोजेक्ट कन्सल्टंट नॉन मेडिकल : 01

दरम्यान यामध्ये प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट -II ला पगार 64,000 रूपये, प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट III ला पगार Rs 54,000/- + HRA आणि प्रोजेक्ट कन्सल्टंट नॉन मेडिकल ला कमाल 1लाख किंवा त्याच्या अनुभवावर अवलंबून असेल असे सांगण्यात आले आहे.

वयो मर्यादा

प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट -II: 40

प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट III: 40

प्रोजेक्ट कन्सल्टंट नॉन मेडिकल : 70

पात्रता निकष

प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट -II साठी उमेदवार MD/MS/DNB पोस्ट ग्रॅज्युएट असावा. एमबीबीएस नंतर एक वर्षाचा अनुभव असावा किंवा पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा हा एमबीबीएस डिग्री नंतर मेडिकल विषयाशी निगडीत 4 वर्षांचा अनुभ्वासअह असावा.

प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट III मध्ये MPH / MS / M.Pharma / MTech केलेला उमेदवार अपेक्षित आहे. त्याचा एक रिसर्च पेपर जर्नल मध्ये प्रसिद्ध असावा.

प्रोजेक्ट कन्सल्टंट हा लाईफ सायंस मध्ये पीएचडी धारक असावा. पिअर रिव्ह्युड जर्नल मध्ये पब्लिकेशन असावं.