Aadhaar- UAN लिंक नसल्यास पीफ जमा होणार नाही; पहा तुमचं UAN आधार सोबत लिंक आहे की नाही कसे तपासाल?
EPFO (Photo Credits-Facebook)

नोकरदारांसाठी आजची 1 डिसेंबर ही तारीख फार महत्त्वाची आहे. जर Universal Account Number (UAN) नंबर सोबत तुमचा आधार नंबर लिंक केलेला नसेल तर आता तुमचा पीफ तुमच्या अकाऊंट मध्ये जमा होणार नाही. EPFO कडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची वेळ देण्यात आली होती. 1 डिसेंबर पासून कंपन्यांना electronic challan-cum-returns (ECR) सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही देखील आधार-यूएएन लिंक केलेल्यांसाठीच असणार आहे. नक्की वाचा:  New Rules from 1st December: PNB व्याज दर, ​SBI क्रेडिट कार्ड EMI, UAN-आधार लिंक यांबाबत 1 डिसेंबरपासून बदलत आहेत नियम; घ्या जाणून.

ईसीआर रूट च्या माध्यमातून ईपीएफओ आणि तुमच्या कंपनीला व्यवहार करणं सुकर होणार आहे. कंपनीला आता त्यांच्याकडे काम करणार्‍यांचे तपशील ECR द्वारा द्यावे लागणार आहेत. ही प्रक्रिया दर महिन्याला करणं बंधनकारक असणार आहे. यामध्ये wages आणि contributions दाखवावं लागणार आहे. Aadhaar-UAN Linking: तुमच्या पीएफ अकाऊंट सोबत Aadhaar Number UMANG App द्वारा, EPFO Portal वर, ऑफलाईन कसा लिंक कराल?

तुमच्या UAN सोबत आधार लिंक आहे की नाही कसे तपासाल?

  • https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या मेंबर सेवा पोर्टलला भेट द्या.
  • तुमचा युएएन नंबर आणि पासवर्ड टाका आणि लॉगिन करा.
  • लॉगिन झाल्यानंतर 'Manage'टॅब मधील 'KYC'चा पर्याय निवडा.
  • व्हेरिफाईड डॉक्युमेंट टॅब मध्ये तुम्हांला आधार नंबर अप्रुव्ह दाखवत असल्यास तुमचा आधार नंबर आणि युएएन नंबर लिंक आहे असे समजा.

मे 2021 मध्ये सरकार कडून आधार नंबर सोबत युएएन नंबर देखील लिंक केलेला असावा असं बंधनकारक केले होते. Code on Social Security, 2020 अंतर्गत सेक्शन 142 द्वारा हा नियम करण्यात आला आहे. यानुसार कंपनी आता ईसीआर फाईल करून प्रत्येक महिन्याचं कॉट्रिब्युशन सादर करू शकते.