New Rules from 1st December:  PNB व्याज दर,  ​SBI क्रेडिट कार्ड EMI,  UAN-आधार लिंक यांबाबत 1 डिसेंबरपासून बदलत आहेत नियम; घ्या जाणून
Wallet, Cash, Pocket, Credit Card, Money | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सरत्या वर्षातील पहिल्याच दिवसापासून काही   नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. यात पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) व्याजदरात कपात, ​SBI क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शन महाग, यूएएन-आधार लिंकिंग (UAN-Aadhaar Link) यांसारख्या बदलांचा समावेश आहे. एक डिसेंबर म्हणजेच आजपासून (New Rules from 1st December) लागू होणारे नियम बदल वेळीच जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित बदलाशी संबंधित मंडळींना काही त्रास आणि आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे हे बदल नेमके आहेत तरी काय? घ्या जाणून.

PNB व्याजदर कपात

पंजाब नेशनल बैंक (Punjab National Bank) आजपासून म्हणजे 1 डिसेंबर 2021 पासून बचत खात्यावरील व्याज दरात आणखी कपात करत आहे. या आदी पीएनबीने एक सप्टेंबर 2021 रोजी व्याज दरात कपात केली होती. पंजाब नॅशनल बँकेत सध्यास्थितीत आणि नव्या सर्व सेव्हींग्ज फंड अकाउंटवरील व्याज दर आता वार्षिक 2.90% असणार आहेत. 1 डिसेंबर 2021 पासून ग्राहकाच्या खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा कमी सेव्हींग फंड अकाऊंट बॅलन्सवर व्याज दर वार्षिक 2.80% इतकी असेल. तर दहा लाखांपेक्षा अधिक ठेव अथवा बचत असलेल्या ग्राहाकांना वार्षिक व्याज 2.85% इतके मिळेल. (हेही वाचा, Aadhaar-IRCTC Linking : महिन्याला 12 रेल्वे तिकीटं बूक करण्यासाठी IRCTC सोबत लिंक करा Aadhaar; पहा irctc.co.in वर ऑनलाईन कसे कराल लिंक?)

एसबीआय क्रेडीट कार्ट EMI ट्रांजेक्शन महागले

एसबीआय क्रेडीट कार्ट वापरुन तुम्ही ट्रांजेक्शन करत असाल तर लक्ष द्या. 1 डिसेंबर 2021 पासून तुमचे सर्व प्रकारच्या खरेदीवर इएमआय ट्रांजेक्शन 99 रुपयांनी महाग होत आहे. शिवाय टॅक्स आणि प्रोसेसिंग शुल्कही वसूल केले जाईल. त्यामुळे क्रेटीट कार्व वापरून तुम्ही खरेदी करत असाल तर काळजी घ्या. अधिक माहितीसाठी एसबीआय क्रेडीट कार्ड यंत्रणेशी संपर्क करा.

UAN-आधार लिंकिंग

कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO) ने UAN आधार लिंकिंग करण्याबाबतची तारीख 30 नोव्हेंबर 2021 इतकी केली आहे. आगोदर हीच डेडलाईन 31 ऑगस्ट 2021 इतकी होती. जर आपण आधार आणि यूएएन लिंक केले नाही तर 1 डिसेंबर 2021 पासून एंप्लॉयर, कर्मचारी आपल्या कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात आपले मासिक योगदान देऊ शकत नाही. सोबतच आधार लिंक नसेल तर कर्मचाऱ्याला आपला प्रेविडंट फंड काढणेही कठीन होऊन बसणार आहे.