कोरोना वायरस जागतिक आरोग्य संकटामुळे गोरगरिबांचं मागील वर्षभरापासून पार कंबरडं मोडून गेले आहे. लॉकडाऊन मुळे अनेक प्रवासी मजूर आपापल्या घरी परतले आहेत. आता अशांना अन्नधान्य मिळावं म्हणून सरकारकडून मदातीचा हात पुढे करण्यात आला आहे. केंद्र सरकारने 'वन नेशन वन राशन कार्ड' (One Nation One Ration Card system) ही योजना देखील लॉन्च केली. पण हा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी त्यासाठी एक खास मोबाईल अॅप देखील लॉन्च करण्यात आले आहे. मेरा राशन (Mera Ration app) असं या अॅपचं नाव असून ते अॅन्ड्राईड युजर्ससाठी गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. सध्या इंग्रजी आणि हिंदी मध्ये हे अॅप उपलब्ध असून हळूहळू 14 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे.
लॉनईन कसं कराल?
मेरा राशन अॅप मध्ये तुम्हांला आधी हे स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करावं लागणार आहे. Mera Ration (CENTRAL AEPDS TEAM) app हे अधिकृत अॅप आहे. त्यानंतर एक लॉग ईन प्रोसेस फॉलो करायची आहे. लॉग ईन करण्यासाठी लाभार्थ्याला आधार कार्ड नंबर किंवा राशन कार्ड नंबर द्यावा लागणार आहे. या नंबरचा वापर करून तुम्ही लॉग ईन करू शकणार आहे. तसेच या अॅप द्वारा काही सुविधांचा देखील लाभ घेता येऊ शकतो.
मेरा राशन अॅप ची वैशिष्ट्य आणि फायदे
मेरा राशन अॅप मध्ये ही राशन वितरणाची व्य्वस्था पारदर्शी होणार आहे. प्रामुख्याने या अॅपचा फायदा प्रवासी लोकं घेऊ शकणार आहेत. कारण आता वन नेशन वन राशन कार्ड योजना अंतर्गत राशन कार्ड धारक देशात कोणत्याही राशनच्या दुकानावरून खरेदी करू शकणार आहे. विविध ठिकाणी फिरणार्यांना जवळपासच्या राशन दुकानांची देखील माहिती मिळू शकेल. National Informatics Centre (NIC)कडून हे अॅप बनवण्यात आले आहे.