Gold Rates: सोन्याच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांत मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. सध्या सोन्याची किंमत 44,680 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोनं प्रति 10 ग्रॅम 57,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत सुमारे 22 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
सोन्याची किंमत का कमी होत आहे ?
जेव्हा जागतिक बाजारात स्थिरता येण्यास सुरुवात होते. तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात. लोक स्टॉक मार्केट सारख्या इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यास सुरवात करतात, जिथून थोड्या काळामध्ये अधिक उत्पन्न मिळू शकेल. अमेरिकेत व्याज दर वाढले आहेत आणि रोजगाराच्या आकडेवारीत सुधारणा झाली आहे. बॉण्ड्ससारख्या साधनांवरील वाढत्या परतावामुळे सोनं कमकुवत होत आहे. (वाचा - 7th Pay Commission: मोदी सरकारने New Wage Code ची अंमलबजावणी केल्यास 1 एप्रिल 2021 पासून लाखो केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात होणार वाढ!)
सोन्याच्या किंमतीत यापुढे घट की वाढ?
अमेरिकेत व्याज दर वाढले आहेत आणि रोजगाराच्या आकडेवारीत सुधारणा झाली आहे. बॉण्ड्ससारख्या साधनांवरील वाढत्या परतावामुळे सोने कमकुवत होत आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, सोन्याची ही कमकुवतता काही दिवसांपर्यंत आहे. सध्या डॉलर कमकुवत आहे, चलनवाढीचा दबाव वाढत आहे आणि या सर्वांमुळे पुढील दिवसांत सोन्याच्या किंमती पुन्हा वाढू शकतात.
क्वांटम म्युच्युअल फंडचे वरिष्ठ फंड मॅनेजर चिराग मेहता यांनी सांगितलं की, "अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जे. जे. पॉवेलने डॉलर कमकुवत असल्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय बायडेन सरकारमधील 1.9 ट्रिलियन डॉलर्सचे मदत पॅकेज आणि पायाभूत सुविधांवर अधिक खर्च करण्याची योजना, कर्जवाटप इत्यादीमुळे डॉलरवरील दबाव कायम राहील. अमेरिकेतील अतिरिक्त खर्चासह, पैसा हळूहळू खालच्या स्तरावर पोहोचेल, महागाई आणखी वाढेल, ज्यामुळे डॉलर आणखी कमकुवत होईल. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुढील आठवड्यांत सोनं आणखी महाग होईल. याचा अर्थ असा की, सध्या सोनं खरेदी करणं ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतं.
पुढे बोलताना मेहता म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतातील सोन्याच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. रुपयाचे मजबुतीकरण आणि सोन्यावरील कस्टम ड्युटीतील कपात हे त्याचे कारण आहे. म्हणूनचं देशांतर्गत गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची ही मोठी संधी आहे.