प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

नोकरदारांसाठी EPFO यंदा आर्थिक वर्ष 2020 साठी व्याज दोन टप्प्यांमध्ये देणार अशी माहिती काल देण्यात आली होती. मात्र आता दोन टप्प्यांऐवजी एकाच हप्यांत पीएफ खातेदारांना 8.5% दराने व्याज देणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती moneycontrol ने CNBC-TV18 सूत्राने दिली आहे. दरम्यान काल (9 सप्टेंबर) Central Board of Trustees ने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 8.5% हा व्याजदर ठरवला आहे. तर केंद्रीय श्रम आणि कामगार मंत्रालयाने देखील हा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला आहे.

काल अनेक मीडीया रिपोर्ट्समध्ये 2019-20 या वर्षासाठी ईपीएफओ सदस्यांना 8.50 टक्के व्याज मिळणार आहे. पण त्यामध्ये 8.15 टक्के सध्या एका टप्प्यांत आणि उरलेले 0.35 टक्के व्याजाची रक्कम दुसर्‍या टप्प्यांत अदा केली जाणार आहे असे सांगितले होते. मोदी सरकारचा नोकरदार वर्गाला झटका, PF वरील व्याजदरात घट.  

EPF अकाऊंट बॅलंस कसा तपासायचा

  • मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून अकाऊंट बॅलंस तपासता येऊ शकतो. त्यासाठी 7738299899 वर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर मेसेज पाठवावा लागतो. त्यासाठी 10 भाषा उपलब्ध आहेत. EPFOHO UAN नंतर ज्या भाषेत एसएमएस हवा आहे त्याची पहिली 3 इंग्रजी भाषेतील अक्षरं टाईप करून 7738299899 वर पाठवावीत.
  • मिस्ड कॉल सर्व्हिस मध्ये 011-22901406 या क्रमांकावर रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून मिस कॉल दिल्यास तुम्हांला बॅलंस समजू शकतो. ही मोफत सेवा आहे.
  • passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login यावर ऑनलाईन माध्यामातूनही तुमचा पीएफ बॅलंस पाहता येऊ शकतो. लॉईग आयडी पासवर्ड दिल्यानंतर तुम्ही अकाऊंट पाहू शकता.
  • 'Umang' mobile application द्वाराही पीएफ बॅलंस पाहता येऊ शकतो. ही सेवा देखील अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

भारतामध्ये नोकरदारांच्या पगारातून 12% पीएफ हा कापला जातो तर 12% कंपनी कडून दिला जातो. तो दर महिन्यात पीएफच्या खात्यामध्ये जमा केला जातो. दरम्यान सध्या कोविड संकटामध्ये 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांना सरकार कडून मदतीचा हात देण्यात आला आहे. यामध्ये दोघांकडूनही दिले 12-12% हप्ते सरकार भरत आहे.