मोदी सरकारचा नोकरदार वर्गाला झटका, PF वरील व्याजदरात घट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI/File)

कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. कारण इपीएफओ यांनी त्यांच्या ग्राहकांच्या भविष्य निधी (PF) वरील व्याजरात कपात केली असून 8.65 ऐवजी आता 8.5 टक्केच व्याज देणार आहे. व्याज दरात 0.15 टक्क्यांनी घट केली आहे. याबाबत माहिती केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी दिली आहे. कर्मचारी भविष्य निधी संगठनमधील गुंतवणूकीवर कमी रिटर्न मिळण्याच्या कारणास्तव यापूर्वीच पीएफवरील व्याजदरात कपात करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, लॉन्ग टर्म एफडी, बॉन्ड आणि सरकारी ईपीएफओला सिक्युरिटीजकडून मिळणारा परतावा वर्षभरात 50-80 बेसिस अंकांनी कमी झाला आहे.

भविष्य निर्वाह निधी जमा (पीपीएफ) आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज योजनांसारख्या अन्य लहान बचत योजनांप्रमाणेच इपीएफवरील व्याज दर देण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून श्रम मंत्रालयावर दबाव आणण्यात येत होता. कोणत्याही आर्थिक वर्षात इपीएफवरील व्याजरात कपात करण्यासाठी श्रम मंत्रालयाला अर्थमंत्रालयाकडून परवानगी घेणे आवश्क आहे. भारत सरकार हमीदार असल्याने, व्याजदराच्या प्रस्तावर आढावा घेणे आवश्यक असते.(PF धारकांना झटका बसणार, व्याजदरात कपात होण्याची शक्यता)

तर काही दिवसांपूर्वीच कर्मचारी भविष्य निधी संगठन यांच्याकडून नोकरदार वर्गाला अलर्ट केले आहे. कारण प्रत्येक्ष क्षेत्रात सध्या फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने त्याबाबत सावध राहण्याची सुचना देण्यात आली आहे. नोकरदार वर्गाने वेबसाईट, टेलिफोन कॉल्स, एसएमएस, इमेल, सोशल मीडिया किंवा फेक ऑफर्स पासून दुर रहावे असे सांगण्यात आले आहे.कंपनीने ग्राहकांना सुचना देत म्हटले आहे की, तुम्हाला क्लेम सेटलमेंट , अॅडवान्स, अधिक पेन्शन किंवा कोणत्याही सुविधेबबात बँकेत पैसे जमा करण्यास सांगितले जाईल. परंतु हे खोटे असून त्यापासून दूर रहा. इपीएफओ यांनी ट्वीट करत याबाबत अधिक माहिती दिली होती.