PF धारकांना झटका बसणार, व्याजदरात कपात होण्याची शक्यता
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

भविष्य निर्वाह निधी संघटन म्हणजेच ईपीएफओ धारकांना झटका बसणार असून व्याजदारात कपात होण्याची शक्यता आहे. व्याजदर 8.65 टक्क्यांनी कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. EPFO 15 ते 25 आधार अंकांनुसार व्याजदर कमी करु शकते. जर असे झाल्यास त्याचा थेट परिणाम 8 करोड पेक्षा अधिक पीएफ धारकांवर होणार आहे. नोकरदारांना पीएफ हा भविष्यात कोणता अडथळा येऊ नये म्हणून एक उत्तम पर्याय आहे. मात्र व्याजदर कमी झाल्यास त्यावर सुद्धा परिणाम होणार आहे.

मिंट या न्युज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, PF वर अधिक रिटर्न देत असल्याने बँकांना त्यांच्या ग्राहकांना आकर्षक व्याज देणे संभव होत नाही. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 2018-19 या वर्षात सेवानिवृत्ती फंडाच्या व्यवस्थापकांनी अर्थ मंत्रालयाशी चर्चा करून सात महिन्यांनंतर आपल्या ग्राहकांसाठी 8.65 टक्के दर निश्चित केला होता.रिपोर्टमध्ये असे ही सांगण्यात आले आहे की, बँकांचे सुद्धा पीएफ सारख्या छोट्या बचतीचा ऑप्शन आहे. पण ईपीएफओ यांच्याकडून भरघोस व्याज देण्यात येत असून त्यांच्याकडे पैसे जमा करण्याकडे दुर्लक्ष करतात.

तर कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) यांनी शुक्रवारी औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता त्यांचा युएन (UAN) क्रमांक स्वत:च जनरेट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने युएन क्रमांक मिळू शकणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना युएन क्रमांकासाठी नोकरीवर नियुक्त केलेल्या व्यक्तीकडे अर्ज द्यावा लागणार नाही आहे. ईपीएफओ यांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ही माहिती देण्यात आली आहे.