BSNL Recruitment 2019: भारतीय दूरसंचार निगम अर्थातच BSNL ने Junior Telecom Officer पदांसाठी पदभरती करायचे ठरवले आहे. त्यासाटी इंजीनिअररींग ग्रॅज्युएट्स (अभियंता पदवी प्राप्त) मंडळींना मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2019 ही अंतिम मुदत आहे. तुम्हालाही BSNLमध्ये काम करायला आवडणार असेल तर, या भरती प्रक्रियेच्या तपशीलाबाबत खाली दिलेली माहिती आपण जरुर पाहू शकता.
पदसंख्या, वेतन आणि विभाग
Junior Telecom Officer पदासाठी एकूण 198 जागा आहेत. त्यासाठी 16400 ते 40500 रुपये इतके वेतन असणार आहे. Junior Telecom Officer च्या Civil ब्रॅंचमध्ये सुमारे 132 पदे आणि Clectrical ब्रँचमध्ये एकूण 66 जागा भरल्या जातील. त्यासाठीच ही भरती होईल.
शैक्षणिक पात्रता
बीएसएनएलमध्ये Junior Telecom Officer पदासाठी शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे तर, उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BE/B.Tech किंवा Electrical/Civil Engineering आणि GATE 2019 उत्तीर्ण असावा. तसेच, नोकरीसाठी अर्ज करणताना उमेदवाराचे वय 18 ते 30 या दरम्यान असावे. (हेही वाचा, MSRTC Mega Bharti 2019: ST मध्ये 4416 पदांसाठी भरती; जाणून घ्या कसा आणि कुठे कराल अर्ज?)
अर्ज करण्यासाठी अधिक माहिती
अर्ज करण्यासाठी खुल्या आणि औबीसी वर्गातील उमेदवारांना 1000 रुपये आणि SC/ST वर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. उमेदवार अर्जशुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून भरु शकतो. भरती साठी अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही www.bsnl.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता. उमेदवारांची निवड GATE 2019 च्या स्कोर आणि मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल.