Representational Image (Photo credits: PTI)

MSRTC Recruitment 2019:  दुष्काळग्रस्त जिल्ह्यात राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) नोकरभरती सुरु केली आहे. एकूण 4416 जागांसाठी भरती होणार असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 12 जिल्ह्यांमध्ये ही नोकरभरती होणार आहे. पुण्यात सर्वाधिक 1647 जागा तर अकोल्यात सर्वात कमी म्हणजे 33 जागा आहेत. याशिवाय औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यात नोकरभरती होणार आहे. दहावी पास उमेदवारांना भारतीय रेल्वेत नोकरीची संधी ! पहा कसा आणि कुठे कराल अर्ज

पदं

# चालक आणि वाहक या पदांसाठी नोकरभरती होणार आहे.

पात्रता

# दहावी पास.

# अवजड वाहन चालवण्याचा परवाना अनिवार्य.

# आरटीओचा चाहक/वाहक बिल्ला असणे अनिवार्य.

# 3 वर्षांचा अनुभव बंधनकारक.

# शिवाय उमेदवाराला रंगआंधळेपणा आणि रातआंधळेपणा नसावा.

वयोमर्यादा

#24-38 वर्षे

# मागासवर्गीयांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारिख

# 8 फेब्रुवारी 2019 पर्यंत उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात.

अर्जाची फी

# सामान्य वर्ग- 600 रुपये

# मागासवर्गीय आणि दुष्काळग्रस्त- 300 रुपये

अधिक माहितीसाठी www.msrtc.gov.in आणि msrtcexam.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.