दहावी पास उमेदवारांना भारतीय रेल्वेत नोकरीची संधी ! पहा कसा आणि कुठे कराल अर्ज
Indian Railway | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

RPF Recruitment 2019: सरकारी नोकरी म्हणजे लाईफ सेट ! अशी अनेकांची धारणा असते. पण त्यासाठी पदवी अनेक परीक्षा पार करून नोकरी मिळते त्यामुळे अनेकजण त्यापासून दूर राहतात पण आता भारतीय रेल्वेमध्ये अवघ्या दहावी पास उमेदवारांसाठीही नोकरीची संधी आहे. सुमारे 798 पदांसाठी कर्मचारी भरती होणार आहे. रेल्वे सुरक्षा दलामध्ये ( Railway Protection Force) कॉन्स्टेबल या पदासाठी ही भरती होणार आहे.

कोणकोणत्या पदांवर होणार भरती ?

कॉन्स्टेबल(वॉटर कॅरिअर)- 452 पद,

कॉन्स्टेबल (सफाईवाला)- 199 पद,

कॉन्स्टेबल (वॉशरमॅन)- 49 पद,

कॉन्स्टेबल - 49 पद,

कॉन्स्टेबल(माळी)- 7 पद,

टेलर(ग्रेड III)- 14

पद, कॉबलर(ग्रेड III)- 22 पद

उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय?

अर्ज करणारा उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेकडून त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.मॅट्रिकऐवजी एसएसएलसी पास असणं आवश्यक आहे.

उमेदवाराची वयोमर्यादा -

कॉन्स्टेबलच्या या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 18 ते 25 या वयोगटातील असावा.

अर्ज कुठे कराल?

इच्छुक उमेदवार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरूनच पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट rpfonlinereg.co.in वर लॉग ईन करून करावं लागेल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2019 आहे.

अर्ज फी किती ?

सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी 500 रुपये शुल्क आहे.

एससी/एसटी/महिला/अल्पसंख्यकांसाठी 250 रुपये शुल्क भरावा लागणार आहे.

निवड कशी होणार?

उमेदवारांची निवड करण्यासाठी एक कम्प्युटराईज्ड परीक्षा होईल. त्यानंतर उमेदवारला शारीरिक दक्षता परीक्षा द्यावी लागेल. ट्रेड टेस्ट आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर उमेदवार निवडला जाईल.

तुम्हांलाही सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर या सुवर्णसंधीला हातातून जाऊ देऊ नका. आजच अर्ज करा.