Big Change in MBBS Course: एमबीबीएस अभ्यासक्रमात मोठा बदल! विद्यार्थ्यांना गाव दत्तक घ्यावे लागणार; 'चरक शपथ' घेणंही असेल आवश्यक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

Big Change in MBBS Course: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) पदवीपूर्व वैद्यकीय कार्यक्रमांमध्ये गुणवत्तेवर आधारित वैद्यकीय शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला महर्षि चरक शपथ (Maharishi Charak Oath) घेण्याची शिफारस केली आहे. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना गाव दत्तक घ्यावे लागेल, असेही यात म्हटले आहे.

महापालिकेच्या परिपत्रकानुसार, वैद्यकीय शिक्षणाला जेव्हा सुरुवात होईल, तेव्हा विद्यार्थांना महर्षी चरक शपथ दिली जाईल. MBBS साठी नवीन सक्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षणाचे उद्दिष्ट तीन क्षेत्रे संज्ञानात्मक, प्रभावशाली आणि मनोप्रेरणा (Psychomotor) समाविष्ट करणे हे आहे. (हेही वाचा - 1 एप्रिल पासून PF Account ते Cryptocurrencies च्या उत्पन्नावर कर, पहा नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी झालेले बदल)

दरम्यान, ऑगस्ट 2019 मध्ये सादर करण्यात आलेला नवीन अभ्यासक्रम वैद्यकीय विद्यार्थ्यांना एक मजबूत पाया आणि सर्वांगीण पैलूंकडे संतुलित दृष्टिकोन मिळेल. यामध्ये फाऊंडेशन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये फॅमिली अॅडॉप्शन प्रोग्राम, योग, ध्यान आणि स्थानिक भाषा शिकणे यांचा समावेश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एमबीबीएसचे विद्यार्थी गाव दत्तक घेणार

गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना गाव दत्तक घ्यावे लागेल, असे म्हटले आहे. परिपत्रकानुसार जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही तेच गाव दत्तक घेता येईल.

दरम्यान, नवीन अभ्यासक्रमावर प्रतिक्रिया देताना FAIMA डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रोहन कृष्णन म्हणाले की, अभ्यासक्रमाच्या रचनेत फारसा बदल झालेला नाही. पूर्वी क्षेत्रभेटीचे प्रशिक्षण तिसर्‍या वर्षी दिले जात होते, आता ते पहिल्या वर्षीच होणार आहे.