बँक (Photo Credits: Twitter)

Bank Holidays in May 2021:  मे महिन्याच्या उत्तारार्धात आपण आलो आहोत. आता मे महिना संपण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. मात्र अखेरच्या 10 दिवसांत चार दिवस सर्व बँका बंद राहणार आहेत. 26 मे बौद्ध पौर्णिमे (Buddha Purnima) दिवशी मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, आगरताला, बेलापूर, भोपाळ, चंडीगढ, देहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद असतील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) दिशानिर्देशांनुसार, देशभरातील सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, विदेशी बँका, सहकारी बँका आणि क्षेत्रीय बँकांसहीत सर्व बँका काही ठराविक दिवशी बंद असतात. त्याचबरोबर सण, विशिष्ट दिवस यानुसार विविध राज्यांमधील बँक हॉलिडेमध्येही फरक पडतो.

देशभरातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनेनुसार, रविवारी देखील बँका बंद असतात. (Bank Holidays in Year 2021: नववर्षात किती मिळणार सुट्ट्या आणि Long Weekends; येथे पहा संपूर्ण यादी)

मे च्या अखेरच्या 10 दिवसांपैकी कोणत्या 4 दिवशी बँका बंद असणार?

22 मे- चौथा शनिवार

23 मे- रविवार

26 मे- बौद्ध पौर्णिमा

30 मे- रविवार

या दिवशी बँका बंद असल्याने त्यानुसारच तुमच्या बँकेच्या कामांचे नियोजन करा. त्यामुळे नाहक त्रास होणार नाही. दरम्यान, बँक हॉलिडेशी निगडीत प्रत्येक अपडेट तुम्ही आरबीआयवर नियमित पद्धतीने चेक करु शकता. तसंच सोशल मीडियावर बँकांसंबधित येणाऱ्या प्रत्येक अपडेट रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन पडताळून मगच त्यावर विश्वास ठेवा.