![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/12/Untitled-design-89-380x214.jpg)
Bank Holidays in April 2021: एप्रिल महिन्यात आपल्याला बँकेत काही काम असेल, तर प्रथम या महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांच्या तारखा जाणून घ्या. अन्यथा आपला दिवस विनाकारण खराब होईल, कारण एप्रिल महिन्यात बँकांचे कामकाज केवळ 18 दिवस चालणार आहे. मार्च अखेरपासून एप्रिलच्या सुरूवातीस 27 मार्चपर्यंत 10 दिवसांत बँका सात दिवस काम करणार नाहीत. यात आर्थिक वर्षाचा शेवट आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात यांचा समावेश आहे.
म्हणूनचं, बँकेत जाण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. एप्रिलमध्ये अनेक सणांना सुरूवात होत आहे. याशिवाय इतर सुट्ट्या देखील आहेत. ज्यात गुड फ्रायडे, सुट्टीमध्ये उगडी, श्री राम नवमी, बाबू जगजीवन राम जयंती, आंबेडकर जयंती यांचा समावेश आहे. (वाचा - Bank Holidays in March 2021: 27 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान केवळ 2 दिवस बँकांचे कामकाज सुरू राहणार; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी)
यासह चार रविवार आणि दोन शनिवारी बँका बंद राहतील. त्यामुळे एप्रिल महिन्यात बँका केवळ 18 दिवस काम करतील. उर्वरित 12 दिवस बँकांना सुट्टी असेल.
एप्रिल महिन्यात बँकांना 'या' तारखेला सुट्टी असेल -
1 एप्रिल - बँकिंग लेखा
2 एप्रिल - गुड फ्रायडे
4 एप्रिल - रविवार
5 एप्रिल - बाबू जगजीवन राम जयंती
10 एप्रिल - दुसरा शनिवार
11 एप्रिल - रविवार
13 एप्रिल - उगड़ी
14 एप्रिल - आंबेडकर जयंती
18 एप्रिल - रविवार
21 एप्रिल - श्रीराम नवमी
24 एप्रिल - चौथा शनिवार
25 एप्रिल - रविवार
या सर्व सुट्ट्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश प्रदेशातील आहेत. पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असू शकते. म्हणून, प्रथम माहिती मिळाल्यानंतरचं कामासाठी बँकेत जा. आरबीआयच्या संकेतस्थळावर बँकेच्या सुट्टीच्या यादीविषयी योग्य माहिती मिळू शकते.