Bank Holidays in March 2021: जर तुम्हाला बँकेसंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ग्राहकांना नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे बँकिंगची कामे मार्गी लावण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, जर शाखेत जाणे आवश्यक असेल तर ग्राहकांना हे माहित असणे आवश्यक आहे की, 27 मार्च ते 4 एप्रिल 2021 पर्यंत बँका केवळ दोन दिवसांसाठी खुल्या असतील. आपले बँकेसंदर्भात काही काम असेल तर ते लवकर करून घ्या. कारण, 27 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान बँका फक्त दोन दिवसांसाठी सुरु असणार आहेत.
दरम्यान, 27 मार्च, 28 मार्च आणि 29 मार्चला सलग तीन दिवस बँका बंद राहतील. 27 मार्च 2021 हा महिन्याचा चौथा शनिवार आहे. 28 मार्च 2021 रोजी रविवार आहे. त्यामुळे या दोन तारखेला देशातील सर्व राज्यात बँका बंद राहतील. होळीच्या निमित्ताने 29 मार्च 2021 रोजी बँका बंद असतील. पण पाटण्यातील बँका सलग चार दिवस बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वेबसाइटनुसार, आपण 30 मार्च रोजी पाटण्यात आपल्या कामासाठी बँक शाखेत जाऊ शकणार नाही. 31 मार्च हा सुट्टीचा दिवस नाही, परंतु आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी बँका ग्राहकांच्या सर्व सेवांकडे फारस लक्ष देऊ शकणार नाहीत.
यानंतर 1 एप्रिल रोजी बँकांच्या लेखाजोखीमुळे पुन्हा सुट्टी असेल. गुड फ्रायडेमुळे 2 एप्रिल 2021 ही सुट्टी आहे. त्यामुळे या दिवशीही बँका बंद राहतील. यानंतर 3 एप्रिल 2021 रोजी सर्व बँका खुल्या असतील. 4 एप्रिल रोजी रविवार आहे. त्यामुळे पुन्हा बँकांना सुट्टी असेल. (वाचा - SBI बॅंकेत Jan Dhan account ग्राहकांना मिळणार 2 लाख रूपयांचा Accidental Insurance Benefits;मात्र त्यासाठी पात्र होण्याकरिता केवळ 'इतकंच' करा)
27 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीचे संपूर्ण वेळापत्रक पहा -
- 27 मार्च 2021 - महिन्याचा चौथा शनिवार
- 26 मार्च 2021 - रविवार
- 29 मार्च 2021- होळी
- 30 मार्च 2021- होळीच्या निमित्ताने फक्त पाटण्यात सुट्टी
- 31 मार्च 2021 - आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस
- 1 एप्रिल 2021 - बँकांचे लेखा
- 2 एप्रिल 2021- गुड फ्राइडे
- 3 एप्रिल 2021 - सर्व बँका खुल्या राहतील
- 4 एप्रिल 2021 - रविवार
लक्षात ठेवा की या सर्व सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या सुट्ट्यांचादेखील समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर आपल्याला यासंदर्भातील इतर माहिती मिळेल.