Amarnath Yatra 2021 Registration: यंदाच्या अमरनाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी jksasb.nic.in वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू
Amarnath's Shiva Lingam (Photo Credits: ANI)

भारतामध्ये कोरोना संकटाच्या सावटाखालीच यंदाच अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) पार पडणार आहे. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती रद्द करण्यात आली होती मात्र यंदा त्याचं पुन्हा आयोजन करणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. आता ते भाविकांसाठी खुलं करण्यात आले आहे. यंदा अमरनाथ श्राईन बोर्डाच्या यात्रेला 6 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. अमरनाथ यात्रेसाठी रजिस्ट्रेशन करणार्‍यांना http://jksasb.nic.in या संकेतस्थळाला भेट देणं आवश्यक आहे. 1  एप्रिल पासून या यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन खुलं करण्यात आले आहे.

दरम्यान ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची वयोमर्यादा कमाल 75 वर्ष आहे. तर किमान 13 वर्ष आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये भाविकांना स्वतःची माहिती देण्यासोबत फोटो, वैद्यकीय प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. यंदा 28 जून ते 22 ऑगस्ट या 56 दिवसांच्या कालावधीमध्ये यात्रा आयोजित कयेत्या काळात यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा देखील आहे. कश्मिरच्या खोर्‍यामधून भाविक प्रवास करत असल्याने या काळात त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

सदर यात्रेसाठी वीजपुरवठा, पाण्याची सोय, वैद्यकिस सुविधा, कंट्रोल रुम, भाविकांसाठीचे तळ, आपत्ती व्यवस्थापन, अन्नपुरवठा, स्वच्छता या साऱ्याबाबतची व्यवस्था करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी प्रशासनाने दिले आहेत.

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने भाविकांना अमरनाथ यात्रेमधे सहभागी होताना देखील काही विशेष कोविड 19 गाईडलाईन सांभाळणं आवश्यक असणार आहे. या यात्रेमध्ये श्रीनगर ते बालटाक पर्यंत हेलिकॉप्टर आणि काही मार्गांवर बॅटरी कार सुरू करण्यावर देखील विचार चालू असल्याचं मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.