Aadhar Card (PC - PTI)

Aadhaar Card Update: जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायाचे असल्यास त्यासाठी आपण आधार केंद्रावर जातो. परंतु तुम्ही अगदी सहजपणे आधार कार्ड मध्ये बदल करु शकता. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पर्यायाचा वापर करता येणार आहे. त्यावेळी तुम्ही पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी मध्ये बदल करु शकता. UIDAI ने नागरिकांसाठी एक सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्याच आधार  कार्ड मध्ये बदल करु शकता. तर नव्या बदलांसह अन्य सुविधांबद्दल अधिक माहिती करुन घ्यायची असल्यास तुम्हाला जवळच्या आधार कार्ड केंद्राला भेट द्यावी लागणार आहे.

जर तुम्हाला नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि भाषेबद्दल ऑनलाईन अपडेट करता येणार आहे. या व्यतिरिक्त पालकांचे डिटेल्स ही बायोमेट्रिक  अपडेट सारखे काम करण्यासाठी आधार केंद्रावर जाणार लागणार आहे. दरम्यान ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी रजिस्टर मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे. कारण व्यक्तिचे वेरिफिकेशन करण्यासाठी रजिस्टर नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो.(Sukanya Samriddhi Yojana: पोस्ट ऑफिस च्या सुकन्या समृद्धी योजनेचे बंद पडलेले खाते पुन्हा कसे सुरु कराल? जाणून घ्या सोपी पद्धत)

UIDAI  च्या अधिकृत वेबसाइटवर प्रथम जावे लागणार आहे. येथे तुम्हाला थेट लिंक उपलब्ध असल्याचे दिसून येईल. त्यानंतर होमपेजवर Proceed to update aadhar card वर क्लिक करा. त्यानंतर कॅप्चा कोड भरा. आता तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो दिल्यानंतर तुम्हाला आवश्यक बदल करता येणार आहेत. परंतु त्यावेळी तुमच्याकडे वैध कागदपत्र असणे गरजेचे आहे.(UAN क्रमांक ॲक्टिव्ह करण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्स फॉलो करा)

आधार कार्ड संबंधित अधिक माहिती तुम्हाला आधार केंद्रावर ही मिळण्यासह त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. तर युआयडीएआयच्या माध्यमातून ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंग करता येणार आहे. आधार सेवा केंद्र हे पासपोर्ट सेवा केंद्रासारखेच आहे.  यामध्ये एक टोकन सिस्टिमवर काम करत आहे. घरात बसून तुम्ही संपूर्ण परिवाराचे एकाच मोबाईल क्रमांकावरुन आधार पीवीसी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करता येणार आहे.