युनिव्हर्सल अकाउंट क्रमांक (UAN) असे खाते आहे जेथे कर्मचाऱ्यांचे EPF जमा केला जातो. आपल्या पीएफ खात्यातील रक्कम किती आहे ते तपासून पाहण्यासाठी तुम्हाला प्रथम UAN अॅक्टिव करावा लागणार आहे. एकदा युएन अॅक्टिव्ह केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासून पाहता येणार आहे. नोकरीत बदल करताना तुम्हाला नव्या UAN च्या नव्या नियुक्तीसह शेअर करावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला मागील खात्यातील शिल्लक रक्कम नव्या खात्यात ट्रान्सफर करता येऊ शकते.(Paytm Launches Personal Loan Service: पेटीएम अवघ्या काही मिनिटांत देणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज, लॉन्च केली पर्सनल लोन सर्विस)
तुमचा युएन क्रमांक तुमच्या सॅलरी स्लिपवर दिसून येणार आहे. जर तुम्हाला UAN पेस्लिपवर दिसून येत नसेल तर तुम्हला ईपीएफच्या आर्थिक विभागाला संपर्क करावा लागणार आहे. तर पुढील काही सोप्पा स्टेप्स फॉलो करुन तुम्ही UAN क्रमांक अॅक्टिव्ह करु शकता.(Investment Tips for Your Child: लहान मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'या' पद्धतीने करा गुंतवणूक)
>जर तुम्ही कधीच पीएफ खात्यातील रक्कम तपासून पाहिली नसेल तर ईपीएफओच्या वेबसाईटच्या माध्यमातून UAN अॅक्टिव्हेट करण्यासाठी प्रथम EPFO च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
>>तेथे गेल्यावर Use Service आणि For Employess वर क्लिक करा.
>> सदस्य युएएन/ऑनलाईन सेवेवर क्लिक करा.
>> UAN अॅक्टिव्ह करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा.
>>तुम्हाला UAN, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक दिल्यानंतर Get authorisation pin वर क्लिक करा.
>>अखेर वॅलिडीटी ओटीपीवर क्लिक केल्यानंतर UAN अॅक्टिव्ह करता येणार आहे.
Tweet:
How to activate UAN?
यूएएन कैसे एक्टिवेट करें?
#EPFO #SocialSecurity #HumHainNa #UAN pic.twitter.com/MYr92fDZaQ
— EPFO (@socialepfo) January 12, 2021
तसेच तुम्ही घरी बसून KYC माहिती संबंधित UAN EPFO पोर्टलच्या माध्यमातून अपडेट करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला UAN ची गरज भासणार आहे. EPFO युएएन पोर्टलवर लॉग इन करुन केवायसी अपडेट करण्यासाठी महत्वाची कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागणार आहेत. त्यानंतर लॉगिन होईल. केवायसी माहितीसाठी तुम्हाला आधार क्रमांक, पॅन क्रमांक आणि बँक खाते क्रमांक द्यावा लागणार आहे.