IISER Bhopal Job Opening: भोपाळ मधील Indian Institute of Science Education and Research मध्ये अनुभवी प्रोफेसर आणि को प्रोफेसर यांची भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुमच्याकडे पदव्युत्तर शिक्षण, संबंधित विषयामध्ये बी टेकची पदवी असेल तर तुम्ही भोपाळमध्ये जाहीर करण्यात आलेल्या या नोकरभरतीमध्ये अर्ज दाखल करू शकता. दरम्यान यासाठी तुम्हांला 30 एप्रिल 2020 पूर्वी अर्ज दाखल करणं गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हांला या नोकरीमध्ये रूजू होण्याची इच्छा असेल तर शक्य तितक्या लवकर अर्ज दाखल करा.
इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. यामध्ये शिक्षण, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, जन्म तारीख अशा महत्त्वाच्या गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे. सोबतच सेल्फ अटेस्टेड कागदपत्रं अंतिम तारखेच्या आधी पाठवणं देखिल अत्यावश्यक आहे. सध्या भोपाळच्या IISER मध्ये Professor, Co-Professor या दोन पदांसाठीच ही नोकर भरती होईल. उमेदवाराची निवड मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. तर नोकरीचं ठिकाण हे भोपाळ असेल. RRB Railway Recruitment 2020: भारतीय रेल्वेमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर; कोणत्याही लेखी परिक्षेशिवाय होणार थेट निवड.
शैक्षणिक पात्रता:
Assistant Professor Grade 2, Grade 1 या दोन्ही पदांसाठी या पदासाठी अर्ज करणार्यांकडे Ph.D मध्ये फर्स्ट क्लास किंवा त्या स्तरावरील पदवी आवश्यक आहे. सोबतच उत्तम शैक्षणिक अनुभव असावा अशी अट आहे.
दरम्यान भोपाळ मधील ndian Institute of Science Education and Research मध्ये प्रोसेसर पदासाठी निवडल्या जाणार्या उमेदवारांना भारत सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. त्यामुळे या पदसाठीची वेतनश्रेणी सुमारे 70,900 ते लाखभर इतकी असू शकते.