Indian Railways (Photo Credits: I File Image)

Indian Railway Cancel Train List: मानवी जीवनात रेल्वे आणि रेल्वेचा प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या कारणास्तव रेल्वेला भारताची जीवनवाहिनी म्हटले जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वे सेवेचा लाभ घेऊन आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात. ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लोक महिनोनमहिने अगोदरच प्लॅनिंग करतात आणि रेल्वे आरक्षणही करतात. आजकाल ट्रेनमध्ये आरक्षण मिळणे अवघड झाले आहे. लोकांच्या सोयीसाठी रेल्वेने 4 महिने आधीच रेल्वे आरक्षण करण्याची सुविधा सुरू केली आहे. अशा स्थितीत कन्फर्म तिकीट घेऊन ट्रेन रद्द झाल्यास प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

ट्रेन रद्द होण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी पाऊस, धुके, वादळ इत्यादी खराब हवामानामुळे रेल्वेला रेल्वेचे संचालन थांबवावे लागते. याशिवाय अनेक ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी रेल्वेला गाड्या रद्द कराव्या लागतात. अशा परिस्थितीत, घरातून बाहेर पडण्यापूर्वी रद्द केलेल्या गाड्यांची यादी पाहणे खूप महत्वाचे ठरते. अन्यथा तुम्हाला नंतर होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. (वाचा - Indian Railways: भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना पुन्हा देणार मोठी भेट, जाणून घ्या सविस्तर)

आज रेल्वेने 513 गाड्या केल्या रद्द -

आज म्हणजेच 27 फेब्रुवारी 2022 रोजी रेल्वेने वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण 513 गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेने एकूण 10 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, रेल्वेने 25 गाड्या वळवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला रद्द, वळवलेल्या किंवा पुनर्निर्धारित ट्रेनमध्ये तुमच्या ट्रेनचे नाव तपासायचे असेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे हे तपासू शकता.

याप्रमाणे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची यादी -

  • रेल्वे स्टेशनसाठी घर सोडण्यापूर्वी रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी, सर्वप्रथम, enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर क्लिक करा.
  • यानंतर, स्क्रीनच्या उजव्या बाजूला वरच्या बाजूला Exceptional Trains हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला रद्द झालेल्या गाड्या, रिशेड्युल केलेल्या आणि वळवलेल्या गाड्यांची यादी दिसेल.

या यादीमध्ये, तुम्ही रद्द केलेल्या ट्रेनच्या यादीचे नाव ट्रेन क्रमांक आणि नाव दोन्हीद्वारे तपासू शकता.