
CNG-PNG Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आजपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किमती वाढल्या आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने CNG च्या दरात प्रति किलो 3 रुपयांनी वाढ केली आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी सकाळपासून नवीन दर लागू झाले आहेत. त्याचवेळी पीएनजीच्या किमतीतही 5 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबादसह अनेक उत्तर भारतीय शहरांमध्ये आजपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढल्या आहेत. कर्नाल, कानपूर आणि मुझफ्फरनगरसारख्या शहरांमध्येही किमती वाढल्या आहेत. (हेही वाचा - Rupee vs Dollar: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण; एका डॉलरची किंमत 82.22 रुपयांवर पोहोचली)
नवीन सीएनजी दर -
- दिल्ली: 75.61 रुपये प्रति किलोवरून 78.61 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहे.
- नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद: 78.17 रुपये प्रति किलोवरून 81.17 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले.
- गुरुग्राम: प्रति किलो 83.94 रुपये ते 89.07 रुपये प्रति किलो.
- रेवाडी: 86.07 रुपये प्रति किलोवरून 89.07 रुपये प्रति किलो.
- कर्नाल आणि कैथल: 84.29 रुपये प्रति किलो ते 87.27 रुपये प्रति किलो.
- मुझफ्फरनगर: 82.84 रुपये प्रति किलो ते 85.84 रुपये प्रति किलो.
- कानपूर: 87.40 रुपये प्रति किलो ते 89.81 रुपये प्रति किलो.
नवीन पीएनजी दर -
दिल्लीत PNG ची किंमत 53.59 प्रति मानक घनमीटर (SCM) पर्यंत वाढली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये किंमत 53.46 वर गेली आहे. त्याच वेळी, मुझफ्फरनगर, शामली आणि मेरठमध्ये किंमत 56.97 प्रति मानक घनमीटरवर पोहोचली आहे. त्याचवेळी, कानपूर, फतेहपूर आणि हमीरपूरमध्ये पीएनजीची किंमत 56.10 पर्यंत वाढवण्यात आली आहे.