इंडियन स्पेस रिसर्च सेंटरने (Indian Space Research Center) अजून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून (Satish Dhawan Space Centre) GSAT-7A या उपग्रहाचं प्रेक्षपण करण्यात आलं. लष्करी सेवांमधील संवाद क्षमता वाढविण्यासाठी हा उपग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे. याची आयुमर्यादा 8 वर्षांची आहे. (हे ही वाचा: ISRO च्या GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण)
प्रिमीयर स्पेस रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, नवा प्रक्षेपित केलेला उपग्रहामुळे हवाई दलाला जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाई तळ आणि AWACS विमानांशी संपर्क करणे शक्य होईल. या उपग्रहामुळे IAF चे नेटवर्क मजबूत करण्यास आणि ग्लोबल ऑपरेशन्स सुधारण्यास मदत होईल. GSAT-7A हा लष्कराचा 35 वा उपग्रह असून तो दळणवळणासाठी वापरला जाईल. (नक्की वाचा: ISROची दमदार मोहीम, स्वदेशी उपग्रह HySISसोबत 8 देशांचे 30 उपग्रह सोडले अवकाशात)
#WATCH: Communication satellite GSAT-7A on-board GSLV-F11 launched at Satish Dhawan Space Centre in Sriharikota. pic.twitter.com/suR92wNBAL
— ANI (@ANI) December 19, 2018
GSAT-7A याचे वजन 2250 किलोग्रॅम आहे. या उपग्रहामध्ये सोलार पॅनल आणि रिफ्लेक्टर्सचा वापर करण्यात आला आहे. या उपग्रहाचा खर्च 500 ते 800 कोटी इतका आहे. GSAT-7A या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणासोबत ISRO ने 2018 मधील 17 वे मिशन यशस्वीरीत्या पूर्ण केले.