इंडियन स्पेस रिसर्च सेंटरने (Indian Space Research Center) अजून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. देशातील सर्वात अवजड उपग्रह GSAT-11 चं युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आलं. हा एक कम्युनिकेशन उपग्रह (Communication Satellite) असून यामुळे भारताता इंटरनेटचा स्पीड (Internet Speed) वाढण्यास नक्कीच मदत होईल. एरियन-5 रॉकेटच्या मदतीने या उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षपण करण्यात आलं.
इसरो ने (ISRO) दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन सुमारे 5,854 किलोग्राम आहे. या उपग्रहामुळे देशभरात ब्रॉडब्रँड सेवा उपलब्ध होतील आणि इंटरनेटचा स्पीड वाढण्यास मदत होईल. इसरो ने आतापर्यंत बनवलेल्या उपग्रहांपैकी हा सर्वात वजनदार उपग्रह आहे. याचा जीवनकाळ 15 वर्षाहून अधिक आहे. यापूर्वी हा उपग्रह 25 मे ला प्रक्षेपित केला जाणार होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे कार्यक्रमात बदल करण्यात आला. अखेर आज GSAT-11 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
#ISRO's heaviest satellite #GSAT11 onboard #Ariane5 VA246 successfully launched from Kourou Launch Zone, French Guiana; GSAT-11 is the next generation high throughput communication satellite important to provide broadband services across the country
Courtesy: DD National pic.twitter.com/cEKrg0KhSt
— All India Radio News (@airnewsalerts) December 4, 2018
GSAT-11 ची अजब क्षमता
उच्च क्षमता असलेला हा उपग्रह प्रत्येक सेकंदाला 100 गीगाबाईटच्या वर ब्रॉडब्रँड कनेक्टिव्हीटी प्रदान करेल. त्याचबरोबर देशभरात प्रगत दूरसंचार आणि डिटीएच सेवा देईल. तसंच हा उपग्रह पूर्वीच्या इनसेट आणि जीसेट उपग्रहांच्या तुलनेत युजर्सला अधिक स्पीड देईल. नव्या पीढीला आपल्या क्षमता प्रदर्शित करण्यासाठी यामुळे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.