भारतीय लष्कर,वायुसेना आणि नौसेना आज 5 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार
भारतीय लष्कर,वायुसेना आणि नौसेना आज 5 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार (Photo Credits-PTI)

भारतीय लष्कर (Indian Army), वायुसेना (Indian Air Force) आणि नौसेना (Indian Navy) दलाची आज गुरुवारी( 28 फेब्रुवारी) संध्याकाळी 5 वाजता एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. पाकिस्तानने भारताला प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांची विमाने पाठवून घुसखोरी करण्याचा बुधवारी प्रयत्न केला होता. तर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मिर येथून एका भारतीय विंग कमांडरला पकडले आहे.

यापूर्वी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी भारतावर बुधवारी असे म्हटले की, भारतीय वायुसेनेचा एक कमांडर ज्याने पाकिस्तानचे F-16 विमान उद्ध्वस्त केले आहे त्याला आम्ही ताब्यात घेतले आहे. तसेच पाकिस्तानकडून आलेल्या मिग-21 विमानावर वायुसेनेने हल्ला करत त्यांचे विमान त्यांच्या हद्दीत पाडले होते.(हेही वाचा-विंग कमांडरच्या वडिलांचे भावूक वक्तव्य- 'अभिनंदन'च्या शौर्याचा अभिमान आहे; तो सुखरुप परत यावा हीच प्रार्थना)

तर बुधवारी विदेश परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी भारतीय वायुसेनेचा कमांडर हरवला असल्याची माहिती दिली होती. तसेच पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर आधी कारवाई करा असे सुनावले. तर आजच्या पत्रकार परिषदेत नेमकी काय भुमिका तिन्ही दलांकडून मांडण्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.