
सोनं आता दाग दागिन्यांपुरता मर्यादित राहिलेले नाही. सोन्याकडे आता गुंतवणूकीचा पर्याय म्हणूनही पाहिले जात असल्याने रोज सोन्याच्या दरात होत असलेली चढ उतार महत्त्वाची आहे. सध्या सुरू असलेला लग्नसराईचा काळ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता याचा परिणाम सोन्याच्या दरावरही होत आहे. आज सोन्याचा दर 100 रूपयांनी घसरला आहे. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9551 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8755 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 7164 रुपये आहे. आज भारतात चांदीचे दर देखील थोडे कमी झाले आहेत. भारतात 1 किलो चांदी 100 रुपयांनी घसरून 99,900 रुपये झाली. तर भारतात 100 ग्रॅम चांदीचा दर 9710 रुपये झाला, जो 10 रुपयांनी वाढला आहे.
MCX आज आंबेडकर जयंतीनिमित्त बंद आहे. त्यामुळे, शुक्रवारच्या व्यवहाराअखेर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या व्यवहारात किंमती हिरव्या रंगात बंद झाल्या. 5 जून रोजी मॅच्युअर होणारा Gold futures चा भाव 93,887 रुपयांवर बंद झाला, जो 0.15 % वाढला. त्याचप्रमाणे, 5 मे 2025 रोजी मॅच्युअर होणारा silver futures भाव 0.01% वाढीसह 94,300 रुपयांवर बंद झाला. Gold Rate Today: 49 दिवसांत सोने 9500 रुपयांनी महागले! या वर्षाच्या अखेरीस काय असेल किंमत? जाणून घ्या .
गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या जिओपॉलिटिकल अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या, त्यानंतर आज भारतात सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. भारतातील विविध राज्ये आणि समुदाय नवीन कापणीच्या हंगामाच्या सुरुवातीचा आनंद साजरा करत असतानाच सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. तामिळनाडूपासून पंजाब आणि आसामपासून बंगालपर्यंत, नवीन वर्षाच्या सुरुवातीचे औचित्य साधून देशभरात अनोखे उत्सव साजरे केले जात आहेत.