Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीचे ताजे अपडेट्स
Petrol-Diesel | (Photo Credit: ANI)

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $86 च्या वर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची सध्या तरी अपेक्षा नाही. भारतीय बाजारात पेट्रोलचे दर स्थिर आहेत. राष्ट्रीय स्तरावर आजदेशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज, 11 फेब्रुवारी 2023 रोजी, दिल्लीत, पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबईसह कोणत्याही महानगरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या आधारावर, तेल विपणन कंपन्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित करतात. मात्र, तेल कंपन्यांनी दीर्घकाळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. (हेही वाचा - DGCA: ICAO च्या एव्हिएशन सेफ्टी ओव्हरसाइट रँकिंगमध्ये भारताने घेतली झेप; 112 व्या स्थानावरून मिळवलं 55 वे स्थान)

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर -

- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.