DGCA: ICAO च्या एकात्मिक पडताळणी मिशन (ICVM) अंतर्गत विमान वाहतूक सुरक्षा निरीक्षण क्रमवारीत (Aviation Safety Oversight Ranking) भारताच्या स्थितीत उल्लेखनीय सुधारणा झाली आहे. या क्रमवारीत 57 स्थानांची जबरदस्त झेप घेत भारत 112 व्या स्थानावरून 55 व्या स्थानावर पोहोचला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी ही माहिती दिली. ICVM भारतात 9-12 नोव्हेंबर 2022 दरम्यान युनिव्हर्सल सेफ्टी ओव्हरसाइट प्रोग्राम (USOAP) सतत देखरेख करण्याच्या दृष्टीकोनांतर्गत आयोजित करण्यात आला होता. (हेही वाचा - Go First वर DGCA ची मोठी कारवाई; विमान कंपनीला 10 लाखांचा दंड; 50 प्रवाशांना सोडून केलं होत उड्डाण)
DGCA ने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, अंतिम अहवाल आल्यानंतर भारताच्या सुरक्षा तपासणी कार्यक्षमतेची क्रमवारी 112 वरून 55 वर आली आहे. ही क्रमवारी ICAO द्वारे केलेल्या वैयक्तिक ऑडिटच्या परिणामांवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) या कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या देशांमध्ये हे ऑडिट करते. (हेही वाचा - DGCA Advisory for Flights: विमानात असभ्य वर्तन करणाऱ्यांची आता खैर नाही! डीजीसीएने जारी केली खास अॅडव्हायजरी)
इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन या कार्यक्रमांतर्गत ऑडिट करते. भारतात गेल्या वर्षी ऑडिट दरम्यान LEG, ORG, PEL, OPS आणि AGA यांचा समावेश करण्यात आला होता. LEG हा प्राथमिक विमान वाहतूक कायदा आणि विशिष्ट ऑपरेटिंग नियमन आहे. ORG ही नागरी विमान वाहतूक संस्था आहे. पीईएल म्हणजे कार्मिक परवाना आणि प्रशिक्षण. ओपीएस म्हणजे एअरक्राफ्ट ऑपरेशन्स. AGA म्हणजे Aerodrome आणि Ground Aid आणि AIR म्हणजे Aircraft Airworthiness.