Income Tax | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Income Tax Notices To People: प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) सुमारे 8000 लोकांना नोटिसा पाठवल्या (Income Tax Notices) आहेत. या लोकांनी कर (Tax) वाचवण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट (Charitable Trusts) ला देणगी दिली आहे. या लोकांनी चॅरिटेबल ट्रस्टला देणगी देण्याच्या नावाखाली कर चुकविल्याचा संशय विभागाला आहे. याप्रकरणी मार्च ते 1 एप्रिल दरम्यान सर्व लोकांना नोटीस पाठवून जाब विचारण्यात आला आहे. हे सर्व व्यवहार 2017-18 ते 2020-21 या वर्षात करण्यात आले आहेत.

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अहवालानुसार, विभागाच्या डेटा अॅनालिटिक्सच्या माध्यमातून असे आढळून आले आहे की, ज्यांनी कर वाचवण्यासाठी धर्मादाय ट्रस्टला देणगी देण्याचा दावा केला आहे, अशा 8000 लोकांचे उत्पन्न आणि खर्च त्यांच्या उत्पन्न आणि खर्चाशी जुळत नाही. म्हणजेच या लोकांची मिळकत आणि चॅरिटेबल ट्रस्टला दिलेल्या देणगीची रक्कम यांचा मेळ नाही. (हेही वाचा - PAN-Aadhaar Linking: पॅन कार्डसोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; जाणून घ्या याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)

दरम्यान, ज्या 8000 लोकांना आयकर नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यात पगारदार ते स्वयंरोजगार असलेल्यांचा समावेश आहे. विभाग या करचुकवेगिरीत गुंतवणुकीचाही तपास करत आहे. या अंतर्गत, अशा कर व्यावसायिक (CA) इत्यादींचाही शोध घेतला जात आहे, ज्यांनी अशा प्रकारचे व्यवहार करण्यात लोकांना मदत केली आहे.

तथापी, आयकर विभाग चॅरिटेबल ट्रस्टची चौकशीही करत आहे, जे अशा व्यवहारांमध्ये सहभागी झाले आहेत. खरेतर, धर्मादाय ट्रस्टला दिलेल्या देणग्या आयकर नियमांनुसार करमुक्त आहेत. अशा स्थितीत अनेकांनी बनावट देणग्या दाखवून करमाफी घेतल्याचा संशय आहे. आता ज्या लोकांना कर नोटीस मिळेल त्यांना उत्तर द्यावे लागेल. त्यांच्या उत्तराने आयकर विभागाचे समाधान झाले नाही तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.