Rafale Fighter Jets (Photo Credit: IAF)

Three more Rafale jets arrive in India : भारतात आज तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे. बुधवारी संध्याकाळी गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमाने उरतली आहेत. ज्यामुळे भारताकडे एकूण 8 राफेल विमानाचे संख्याबळ आहे. भारताने फ्रान्ससह 59 हजार कोटींचा करार करून एकूण 26 विमानाची खरेदी केली आहे. यापैकी पाच राफेल विमानांची पहिली बॅच पंजाबमधील अंबालामध्ये दाखल झाली होती. तर, राहिलेले 28 राफेल विमान टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होणार आहेत.

भारतीय वायुदलाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात दाखल झालेल्या तीन राफेल विमानांनी फ्रान्समधून उडाण घेतली असून मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. तसेच भारतीय वायुदलाला प्रत्येक दोन महिन्यांनंतर तीन ते चार राफेल विमाने दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा-Domestic Flights: भारतीय विमान कंपन्यांना 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत 60 टक्के देशांतर्गत उड्डाणे चालवण्यास परवानगी- Civil Aviation Ministry

एएनआयचे ट्वीट-

भारतीय हवाई दलात जून 1997 मध्ये रशियाच्या सुखोई-30 या लढाऊ विमाने सामिल झाले होते. त्यानंतर 23 वर्षांनंतर राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यात आली आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाई दल अधिक आक्रमक होणार असून त्यांची क्षमताही वाढली आहे.