Hyderabad: 24 वर्षात 18 महिलांच्या हत्या करणारा सीरियल किलर गजाआड; पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

हैदराबाद (Hyderabad) येथील टास्क फोर्सच्या टीमने एका सीरियल किलरला (Serial Killer) ताब्यात घेतले आहे. ताडीच्या दुकानात येणाऱ्या महिलांना हा आरोपी लक्ष बनवित होता. महिलांची हत्या करण्याशिवाय इतर अनेक गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. अटकेची कारवाई केल्यानंतर नुकतीच हत्या झालेल्या दोन महिलांच्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे. संयुक्त मोहीम राबवत आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलांची हत्या का करायचा? हे कारण ऐकून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

एम रामल्लू असे आरोपीचे नाव आहे. रामल्लू हा बोराबंदा येथील मजुराचे काम करतो. रामल्लू याचे वयाच्या 21व्या वर्षीय आरोपीचे लग्न झाल होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्याची पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. तेव्हापासून त्याच्या मनात महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. अटक करण्यात आल्यानंतर आरोपी 21 गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले. यामध्ये 16 हत्या, संपत्तीशी संबंधित चार गुन्हे आणि पोलीस कोठडीतून पळून जाण्याच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. हे देखील वाचा- भोपाल: Happen App वरुन अल्पवयीन मुलीला मैत्री करणे पडले महागात, पहिल्याच भेटवेळी तरुणाने केला बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 2003 पासून 2019 पर्यंत एकूण 16 हत्या केल्या आहेत. दरम्यान, अटकेची कारवाई केल्यानंतर नुकतीच हत्या झालेल्या 2 महिलांच्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे. 2009 मधील हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षादेखील झाली होती. शिक्षा भोगत असतानाच त्याने जेलमधून पळ काढला होता. यादरम्यान त्याने 5 हत्या केल्या. त्याला 2013 मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने 2018 मध्ये त्याला जामीन दिला होता, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृतात दिली आहे.