भोपाल: Happen App वरुन अल्पवयीन मुलीला मैत्री करणे पडले महागात, पहिल्याच भेटवेळी तरुणाने केला बलात्कार
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

भोपाल (Bhopal) मधील शाहपुर थाना क्षेत्रात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 23 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती देत असे म्हटले की, युवराज कुमार या नावाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने त्याच्या विरोधात आयपीसी कलम 376 आणि पॉस्को कायद्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(राजस्थान येथे एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय मुलीवर गोळीबार)

पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार. तरुणाची 4-5 दिवसांपूर्वी सोशल डेटिंग अॅप हॅपन वरुन पीडित मुलीसोबत ओळख झाली. त्यानंतर पीडित मुलीला भेटण्यासाठी त्याने बोलावले आणि ऑटो रिक्षाने तिला शाहपुर येथील घरी घेऊन आला. तेथेच तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी पुढे असे म्हटले की,या घटनेनंतर पीडित मुलगी रस्त्यावर येऊन रडत होती.(घृणास्पद! भररस्त्यात तरूणीसमोर एका अज्ञात इसमाने आपले गुप्तांग दाखवून विनयभंग करण्याचा केला प्रयत्न, अहमदाबाद मधील लाजिरवाणी घटना)

Tweet:

दरम्यान, मदत करणाऱ्या तरुणांने असे म्हटले की, मुलीने फोन करत मदत मागितली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव येत ती एका तळ्याच्या येथे रडत बसली होती. मुलीच्याच मोबाईलवर तरुणाला फोन केला. पण तरुणाने तेव्हाच आपल्या एका मित्रासोबत तिला घेऊन जाऊ लागला असता त्याला मुलीच्या मित्रांनी पकडले. या प्रकारानंतर त्याला पोलिसात देण्यात आले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा बिहार येथील रहिवाशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आता विस्तृतपणे तपास सुरु करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी आणि तरुणाची ओळख एका सोशल मीडियावरील डेटिंग अॅपवर झाल्याचे ही पोलिसांनी म्हटले आहे.