राजस्थान येथे एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय मुलीवर गोळीबार
प्रातिनिधीक प्रतिमा (Gun-encounter)

राजस्थान मधील भरतपूर प्रदेशात सातत्याने महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याच दरम्यान आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कोतवाली थाना परिसरातील मुखर्जी नगर कॉलनीत एकतर्फी प्रेमातून शेजारील तरुणाने 19 वर्षीय मुलीवर गोळीबार करत तिची हत्या केली आहे. असे सांगितले जात आहे की, मुलगी छतावर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्याच दरम्यान छतावर चढून तरुणाने तिला गोळी मारली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.(दिल्ली: प्रियकरासोबतच्या लव्ह अफेअर बद्दल घरी कळू नये म्हणून मैत्रिणीचीच केली हत्या) 

पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देस असे म्हटले की, मुलीचे आई वडील शिक्षक आहेत. परंतु घटनेच्या वेळी ते दोघे सुद्धा घरी नव्हते. तरुण आणि मुलीमध्ये प्रेमप्रकरणावरुन वाद ही झाला होता. तर मृत मुलीच्या वडिलांनी असे म्हटले की तरुण तिला त्रास सुद्धा द्यायचा. पण अखेर तरुणाने मुलीवर गोळ्या झाडल्या.(Delhi: पतीच्या बाईकवरुन उतरली अन् वडिलांच्या गाडीवर बसली; त्यानंतर 'त्या' महिलेसोबत घडली 'अशी' दुर्देवी घटना)

गोळीबार करण्यात आल्यानंतर मुलगी जोरात ओरडली असता तिच्या बहिणीने तिचा आवाज ऐकत धावत छतावर आली. त्यावेळी आरोपीच्या हातात हत्यार होती. पण बहिणीला पाहिल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. असे सांगितले जात आहे की, आरोपी मृत मुलीला मोबाईलवरुन मेसेज करत होता.