Delhi: पतीच्या बाईकवरुन उतरली अन् वडिलांच्या गाडीवर बसली; त्यानंतर 'त्या' महिलेसोबत घडली 'अशी' दुर्देवी घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

भावाचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या दिल्लीतील (Delhi) एका महिलेसोबत दुर्देवी घटना घडली आहे. वाढदिवसानिमित्त हॉटेलवर जेवून परत असताना गाडीवरून खाली पडून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. संबंधित महिला आपल्या माहेरी गेली होती. मात्र तिच्या भावाचा वाढदिवस असल्यामुळे ती एका हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. त्यानंतर घरी परत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. ज्यात ती महिला गंभीर जखमी झाली. मात्र, आज अखेर उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

पिंकी विमल असे मृत महिलेचे नाव आहे. पिंकी या विवाहित असून काही दिवसांपूर्वी त्या माहेरी आल्या होत्या. शनिवारी पिंकी यांच्या भावाचा वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांचे संपूर्ण कुटूंब जवळील एका हॉटेलवर जेवायला गेले होते. दरम्यान, पार्टी करुन घरी परतत असताना विमल अर्ध्या रस्त्यापर्यंत आपल्या पतीच्या बाइकवर बसल्या होत्या. मात्र माहेरी जायचे असल्यामुळे त्या पतीच्या गाडीवरुन खाली ऊतरल्या आणि  आपल्या वडिलांच्या गाडीवर बसल्या. परंतु, माहेरी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात मागे बसलेल्या पिंकी रस्त्यावरच पडल्या. दरम्यान, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- बिहार: बायकोच्या विवाहबाह्य संबंधात नवरा ठरला अडथळा, नाकात-कानात फेविक्विक टाकत अत्यंत क्रूरपणे केली हत्या

या अपघातात मरण पावलेल्या पिंकी यांना दोन मुले आहेत. रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे. या अपघातानंतर आजूबाजुच्या परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.