Husband Beats Wife in Haryana: कारमध्ये  दुसऱ्या तरुणासोबत बसली होती बायको, पतीने केली बेदम मारहाण
Crime | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Husband Beats Wife in Haryana: हरियाणातील पंचकुलामध्ये एका महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, पतीने पत्नीला सेक्टर-26 येथील एका पार्कमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत कारमध्ये बसलेले पाहिले होते. यानंतर त्याने कारची काच फोडली आणि बेसबॉलच्या बॅटने पत्नीला बेदम मारहाण केली. महिलेचा आरडाओरडा ऐकून अनेक लोक तेथे पोहोचले, मात्र कोणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहे.

हरियाणात पतीने पत्नीला केली बेदम मारहाण  (पहा व्हिडिओ)

या हल्ल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी पती फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.